सामान्य माणसापर्यंत काेराेना लस कधी पाेहाेचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:08 IST2021-02-21T05:08:51+5:302021-02-21T05:08:51+5:30

आठ दिवसांपूर्वीपर्यंत काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली हाेती. ती पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपल्याला लस कधी मिळणार? ...

When will the common man get the carina vaccine? | सामान्य माणसापर्यंत काेराेना लस कधी पाेहाेचणार

सामान्य माणसापर्यंत काेराेना लस कधी पाेहाेचणार

आठ दिवसांपूर्वीपर्यंत काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली हाेती. ती पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपल्याला लस कधी मिळणार? अशी उत्सुकता सामान्य व्यक्तींमध्ये कायम आहे. मात्र सामान्य व्यक्तीला लस देण्याविषयी अजूनर्यंत काेणतेही नियाेजन नाही. काेणाला लस द्यायची, हे ठरविण्याचे अधिकार केंद्र शासनाला आहेत. शासनाकडून जाेपर्यंत निर्देश प्राप्त हाेत नाहीत, ताेपर्यंत सामान्य व्यक्तीला लस देणे अशक्य असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे.

बाॅक्स

काेव्हॅक्सीनही उपलब्ध

पहिल्या टप्प्यात गडचिराेली जिल्ह्यात काेव्हिशिल्ड या लसीचे १८ हजार डाेस उपलब्ध झाले. बहुतांश आराेग्य कर्मचाऱ्यांना हीच लस देण्यात आली आहे. त्यानंतर आता काेव्हॅक्सिनच्या ७ हजार १०० लसी पुन्हा उपलब्ध झाल्या आहेत.

बाॅक्स

१७ एप्रिलपर्यंत उद्दिष्ट्य पूर्ण हाेणार

१० हजार २६६ आराेग्य कर्मचारी व १५ हजार ६८३ इतर कर्मचारी असे एकूण २५ हजार ९४९ कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दरदिवशी जवळपास ३५० ते ४०० आराेग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. जवळपास १७ एप्रिलपर्यंत उद्दिष्ट ठरविलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना लस मिळेल, असा विश्वास आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे.

बाॅक्स

हे आहे उद्दिष्ट

आराेग्य कर्मचारी- १०,२६६

पाेलीस- १२,३९१

पंचायत राज संस्था- १४३१

महसूल विभाग-१,२०५

एकूण- २५,९४९

बाॅक्स

केंद्रनिहाय झालेले लसीकरण

गडचिराेली- १,९८१

कुरखेडा-९८९

धानाेरा-९६३

अहेरी-१,३११

चामाेर्शी-१,१७५

देसाईगंज-७०९

आरमाेरी-९७८

काेरची-५६७

मुलचेरा-५१४

सिराेंचा-४०३

भामरागड-३२४

एटापल्ली-४१८

एकूण-१०,३३२

बाॅक्स

४०० जणांना जिल्ह्यात राेज लस दिली जात आहे.

१०,३३२ जणांना आत्तापर्यंत लस दिली.

Web Title: When will the common man get the carina vaccine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.