पोलीसदादाच नियम तोडतो तेव्हा...!

By Admin | Updated: May 8, 2015 01:30 IST2015-05-08T01:30:01+5:302015-05-08T01:30:01+5:30

जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक असलेल्या देसाईगंज येथे रेल्वेफाटक पडल्यानंतर वाहनांची तोबा गर्दी होते.

When the police breaks the rules ...! | पोलीसदादाच नियम तोडतो तेव्हा...!

पोलीसदादाच नियम तोडतो तेव्हा...!

विसोरा : जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक असलेल्या देसाईगंज येथे रेल्वेफाटक पडल्यानंतर वाहनांची तोबा गर्दी होते. घाईत असणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. रेल्वेफाटक बंद असतांना वाहन काढल्यास जीव जाण्याचा धोका संभवतो, मात्र जनतेचे संरक्षण करणारे सेवक तसेच सदैव शिस्तीचे पालन करणारे पोलिसच जेव्हा कायदा पायदळी तुडवितात तेव्हा सर्वसामन्यांच्या मनात पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. नियमाचा धाक दाखविणाऱ्यांकडून नियम मोडल्या जातात, त्याचेच हे बोलके दृश्य !

Web Title: When the police breaks the rules ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.