व्हॉटस् अ‍ॅप वरदानच !

By Admin | Updated: September 29, 2014 23:06 IST2014-09-29T23:06:21+5:302014-09-29T23:06:21+5:30

व्हॉटस् अ‍ॅप हे आधुनिक जगातील अत्यंत महत्वाचे साधन ठरले आहे. त्यामुळे व्हॉटस् अ‍ॅप. हे वरदानच आहे, अशी मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

Whatsapp! | व्हॉटस् अ‍ॅप वरदानच !

व्हॉटस् अ‍ॅप वरदानच !

गडचिरोली : व्हॉटस् अ‍ॅप हे आधुनिक जगातील अत्यंत महत्वाचे साधन ठरले आहे. त्यामुळे व्हॉटस् अ‍ॅप. हे वरदानच आहे, अशी मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
लोकमत युवा नेक्स्ट व महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेंबर रोजी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हंसा तोमर तर प्रमुख अतिथी म्हणून सपना थिमनकर, लोकमतच्या जिल्हा संयोजिका वर्षा पडघन, प्रा. योगशे पाटील व प्रा. डॉ. अनिता लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. वादविवाद स्पर्धेत समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी राकेश कुनघाडकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक रिना टेकाम तर तृतीय क्रमांक हरिणी मेश्राम यांनी पटकाविला. विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी व्हॉटस् अ‍ॅप. चे फायदे व तोटे या दोनही बाजू अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडल्या. प्रत्येक तंत्रज्ञानाचे ज्याप्रमाणे काही फायदे आहेत. तसेच त्याचे काही तोटेही आहेत. मात्र तोट्यांचा विचार करून तंत्रज्ञानाचा स्वीकार न करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. व्हॉटस् अ‍ॅप. चे अनेक फायदे नागरिकांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळेच जगातील अनेक नागरिक व्हॉटस् अ‍ॅप. चा वापर करीत असल्याचे विचार मांडले.
युवक, महिला व विद्यार्थी यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमतच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन वर्षभर करण्यात येते. या उपक्रमाचा जिल्ह्यातील हजारो नागरिकांना लाभ होतो. लोकमतचे अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे, व्हॉटस् अ‍ॅप. हे आधुनिक जगातील अत्यंत महत्वाचे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने उपयोगकर्ता कशा पद्धतीने करतो यावर अवलंबून असले तरी याचे फायदे नाकारता येत नाही. अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. प्रास्ताविक योगेश पाटील, संचालन कल्याणी मेश्राम तर आभार पूजा गायमुखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्योती मेश्राम, वाटगुरे, कांचन कोडमवार यांनी सहकार्य केले. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मतदार जनजागृतीकरिता पथनाट्य सादरीकरणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पथनाट्य सादर करणाऱ्यांनी महिला महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Whatsapp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.