हिंदू नववर्षाचे स्वागत...
By Admin | Updated: April 9, 2016 00:42 IST2016-04-09T00:42:06+5:302016-04-09T00:42:06+5:30
चैत्रशुध्द प्रतिपदा हा हिंदू संस्कृतीतील नववर्षाचा पहिला दिवस.

हिंदू नववर्षाचे स्वागत...
चैत्रशुध्द प्रतिपदा हा हिंदू संस्कृतीतील नववर्षाचा पहिला दिवस. प्रभू श्रीरामचंद्र १४ वर्षांचा वनवास भोगून अयोध्या नगरीत परतल्याचा आनंदाचा दिवस संपूर्ण भारतात गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. यंदा शुक्रवारी या दिवसाचे औचित्य साधून शहरात हिंदू धर्मातील विविध संप्रदायाच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. या स्वागतयात्रेतून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याबरोबरच सामाजिक व वास्तविक समस्यांवरही भजन, शोभायात्रेद्वारे जनजागृती करण्यात आली.