लग्न वऱ्हाडाचे वाहन उलटले
By Admin | Updated: April 21, 2015 01:13 IST2015-04-21T01:13:53+5:302015-04-21T01:13:53+5:30
वरात घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्राली पलटल्याने झालेल्या अपघातात १५ वऱ्हाडी जखमी झाले असून यातील सहा

लग्न वऱ्हाडाचे वाहन उलटले
१५ जखमी : सहा गंभीर; चंद्रपूर, गडचिरोलीला हलविले
एटापल्ली : वरात घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्राली पलटल्याने झालेल्या अपघातात १५ वऱ्हाडी जखमी झाले असून यातील सहा वऱ्हाडी गंभीर जखमी आहेत. सदर अपघात तालुक्यातील पामाजीगुडा या गावाजवळ सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला.
गंभीर जखमी असलेल्यांमध्ये लक्ष्मी नुला आलाम (२२), साधू लिंगू दोरपेटी (११), कमली राजू पुंगाटी (२५), देचो हिचामी (४५), माटे गिला दोरपेटी (४८), मैनी सोया दोरपेटी (४५) यांचा समावेश आहे. यातील कमली पुंगाटी हिला चंद्रपूर येथे तर मैनी दोरपेटी हिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मुरी दोरपेटी (६५), मनी आलाम (१९), शांती दोरपेटी (२०), राधा दोरपेटी (२०), सोमा दोरपेटी (१८), सन्नो आलाम (६०), राजू परसा (३५), सुमन हिचामी (२०), सोनी आलाम (३९) अशी किरकोळ जखमींची नावे आहेत. हे सर्व नागरिक पामाजीगुडा येथील आहेत. नवरी मुलगी रजनी जोही ही सुध्दा किरकोळ जखमी झाली आहे.
मोडस्के येथील रजनी जोही हिचा साखरपुडा पामाजीगुडा येथील विष्णू विष्णू पैका परसा यांच्यासोबत होणार होता. त्यासाठी नवरीला घेऊन पामाजीगुडा येथील नागरिक व नवरदेवाचे कुटुंब नवरीच्या गावी मोडस्के येथे निघाले होते. दरम्यान काही दूर अंतर गेल्यानंतर पामाजीगुडा गावाजवळच ट्रॅक्टर पलटली. यामध्ये १५ वऱ्हाडी जखमी झाले. सर्व जखमींवर टिटोळा येथील आशावर्कर छाया दानू जेट्टी यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांना त्यांच्याच चारचाकी वाहनाने ग्रामीण रूग्णालय एटापल्ली येथे भरती करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच एटापल्लीचे सभापती दीपक फुलसंगे यांनी ग्रामीण रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. (तालुका प्रतिनिधी)