रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेला निधी उपलब्ध करू

By Admin | Updated: July 5, 2015 01:44 IST2015-07-05T01:44:05+5:302015-07-05T01:44:05+5:30

देसाईगंज नगर पालिका जिल्ह्यातील प्रगत नगर पालिका म्हणून नावलौकिक प्राप्त असल्याने या माध्यमातून शहराचा विकास करण्यास आपण कटिबद्ध आहोत,

We will provide funds to the water supply scheme | रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेला निधी उपलब्ध करू

रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेला निधी उपलब्ध करू

पालकमंत्र्यांचे आश्वासन : देसाईगंज नगर पालिका सभागृहात बैठक
देसाईगंज : देसाईगंज नगर पालिका जिल्ह्यातील प्रगत नगर पालिका म्हणून नावलौकिक प्राप्त असल्याने या माध्यमातून शहराचा विकास करण्यास आपण कटिबद्ध आहोत, शहरातील पाणीपुरवठा योजना निधी अभावी रखडली आहे, ती मार्गी लावण्याचा शासनस्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गुरूवारी दिले.
स्थानिक नगर पालिकेच्या सभागृहात आयोजित वार्षिक आर्थिक नियोजन बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी आ. क्रिष्णा गजबे, नगराध्यक्ष श्याम उईके, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, न. प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, बाबुराव कोहळे, विलास गावंडे, राम लांजेवार, पं. स. सदस्य चांगदेव फाये, तहसीलदार अजय चरडे, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, विलास साळवे, आबीद अली उपस्थित होते.
देसाईगंज शहराच्या विकासासाठी रखडलेली अनेक कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाईल, तसेच शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन व आभार मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी मानले. यावेळी नगर परिषद पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: We will provide funds to the water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.