झाडियांच्या मागण्या सरकारसमोर ठेवू

By Admin | Updated: December 18, 2014 22:55 IST2014-12-18T22:55:38+5:302014-12-18T22:55:38+5:30

झाडियांच्या मागणीला संसदेत उपस्थित करून या जमातीच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक विकासासाठी आपले प्रयत्न राहतील. यासाठी केंद्र व राज्याची संयुक्त बैठक बोलावून त्

We will keep the demands of the trees in front of the government | झाडियांच्या मागण्या सरकारसमोर ठेवू

झाडियांच्या मागण्या सरकारसमोर ठेवू

गडचिरोली : झाडियांच्या मागणीला संसदेत उपस्थित करून या जमातीच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक विकासासाठी आपले प्रयत्न राहतील. यासाठी केंद्र व राज्याची संयुक्त बैठक बोलावून त्यात जमातीच्या शिष्टमंडळालाही पाचारण करू, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले. कारवाफा येथे चंद्रपूर-गडचिरोली झाड्या किंवा झाडिया जमात समितीच्यावतीने नवनिर्वाचित खासदार, आमदारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, झाड्या जमातीचे प्रथम संशोधक डॉ. सुशील कोहाड, झाड्या किंवा झाडिया जमातीचे जिल्हाध्यक्ष अनिल मंटकवार, भाजपचे प्रदेश सचिप प्रमोद पिपरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, रेखाताई डोळस, प्रकाश अर्जुनवार, डॉ. भारत खटी, अनिल पोहणकर, साधुजी होळी, गोपाल उईके, जि.प. सदस्य शांता परसे, ऋषी मडावी, चित्रलेखा रायपुरे, प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी जयेंद्र बर्लावार, यमाजी तुकंलवार, सिताराम नेचलवार, पुंडलिक चौधरी, मलय्या चौधरी, प्रकाश मुसद्दीवार, पुरूषोत्तम अर्कपटलावार, सखाराम दिचटीवार, चंद्रभान कोमलवार, संतोष वंडेगलवार, धनुजी मंटकवार, सत्यम निलम आदी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्य शासनस्तरावर सुस्पष्ट शासन निर्णय असताना जमातीस अजुनपर्यंत कोणत्या सूचित आहे. हे असंशोधीत आहे. समुहाला प्रमाणपत्र मिळून त्यांच्या विकासासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करू, असे सांगितले. डॉ. सुशिल कोहाळ यांनी मूळ जमात समुहाच्या झाड्या, झाडीया, झाडे १९५० पूर्वीचे राजस्व दस्ताऐवज आहे. भूमीचे नाव व समुहाचे नाव एकच गोंडवाना, तेलंगणा, मराठा तीन भाषिक देशीय त्रिकोणात भूमी झाडीपट्टी/झाडी मंडळाचा मूळ निवासी असे अप्रभंस जमातीबाबत आहे. यांचे मागासलेपण अजुनही कायम आहे. याबाबत राज्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनार्दन तुंकलवार यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: We will keep the demands of the trees in front of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.