कामगारांच्या हक्कासाठी संघर्षयात्रा काढणार

By Admin | Updated: April 21, 2016 01:45 IST2016-04-21T01:45:53+5:302016-04-21T01:45:53+5:30

एसटी कामगारांना सातवा वेतन आयोगाच्या सर्व शिफारसी व भत्ते लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांची संघर्ष यात्रा गडचिरोली येथून सिंधूदुर्गकडे काढण्यात येणार आहे.

We will fight for the rights of workers | कामगारांच्या हक्कासाठी संघर्षयात्रा काढणार

कामगारांच्या हक्कासाठी संघर्षयात्रा काढणार

एसटी कामगार मेळावा : गडचिरोलीत जयप्रकाश छाजेड यांचे प्रतिपादन
गडचिरोली : एसटी कामगारांना सातवा वेतन आयोगाच्या सर्व शिफारसी व भत्ते लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांची संघर्ष यात्रा गडचिरोली येथून सिंधूदुर्गकडे काढण्यात येणार आहे. या संघर्ष यात्रेचा समारोप १२ मे रोजी सिंधूदुर्ग येथे होणार आहे, असे प्रतिपादन एसटी कामगारांच्या इंटक संघटनेचे राज्याध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केले.
महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) गडचिरोली विभागातर्फे बुधवारी येथील पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात एसटी कामगार मेळावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटक म्हणून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार तर प्रमुख अतिथी म्हणून इंटकचे कार्याध्यक्ष मुकेश तिघोटे, महासचिव कमलाकर घाटोळे, नागपूर प्रदेश सचिव शैलेश भारती, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, गडचिरोलीचे कार्याध्यक्ष सुनील खोब्रागडे, विजय बोरगमवार, शंकरराव सालोटकर, राजू चौधरी, लक्ष्मीकांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कमलाकर घाटोळे म्हणाले, एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांच्या अधिनस्त कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठबळ मिळत आहे. त्यामुळे एसटी कामगारांची अवस्था वाईट झाली आहे. सरकारच्या दुजाभाव वृत्तीमुळे विदर्भाच्या वाट्याला नेहमीच भंगारबस दिल्या जातात. तर पश्चिम महाराष्ट्रात नव्या बसगाड्या दिल्या जात आहेत. एसटी कामगारांना सरकारकडून जीवाची सुरक्षा, आरोग्याची हमी मिळत नाही. एसटी कामगारांच्या न्याय व हक्कासाठी प्रसंगी इंटक न्यायालयात धाव घेणार, असेही ते यावेळी म्हणाले.
भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार एसटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे एसटी कामगारांची पिळवणूक होत आहे. काँग्रेस एसटी कामगारांच्या पाठीशी सदैव उभी राहणार असून एसटी कामगारांवरील अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी दिला.
या कार्यक्रमात इंटकचे कार्याध्यक्ष मुकेश तिगोटे यांचेही भाषण झाले. त्यांनी एसटी कामगारांसाठी संघर्ष करू, असे सांगितले. प्रास्ताविक चक्रधर जांभुळे, संचालन अशोक लेंभाडे यांनी केले.

Web Title: We will fight for the rights of workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.