वैरागडात चार दिवसआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:18+5:302021-04-28T04:39:18+5:30
वैरागड येथे ३०-४० वर्षांपूर्वीची जुनी पाणीपुरवठा योजना आहे. गावाची लोकसंख्या वाढल्याने मागील १५ वर्षांपासून ही याेजना अपुरी पडत ...

वैरागडात चार दिवसआड पाणीपुरवठा
वैरागड येथे ३०-४० वर्षांपूर्वीची जुनी पाणीपुरवठा योजना आहे. गावाची लोकसंख्या वाढल्याने मागील १५ वर्षांपासून ही याेजना अपुरी पडत आहे. परंतु, येथील पाणी समस्येकडे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. सध्या येथील पाणी समस्या गंभीर झाली आहे. येथे चार दिवसआड नळाला अत्यल्प पाणी येते. नळाला पाणी आल्यानंतर पिण्यापुरते तरी पाणी मिळावे म्हणून महिलांची धावपळ सुरू होते. सखल भागात असलेल्या नळालाच पाणी येते. ३ व ४ वॉर्डांतील नळांना अजिबात पाणी येत नाही.
विशेष म्हणजे, पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ पाईपलाईनला गळती आहे. त्या गळतीचे पाणी नागरिक पिण्यासाठी आणत आहेत. गळतीजवळ दिवसभर गर्दी असते. वैरागड येथील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पावले उचलावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
260421\380426gad_10_26042021_30.jpg
===Caption===
तीन चाकी सायकलवर गळतीचे पाणी नेताना दिव्यांग.