पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा

By Admin | Updated: April 14, 2016 01:38 IST2016-04-14T01:38:54+5:302016-04-14T01:38:54+5:30

प्रचंड उष्णतामान व यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

Water supply through tanker water | पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा

पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा

वन्य प्राण्यांना पाण्याची सुविधा : चामोर्शी वन परिक्षेत्रात २३ कृत्रिम पाणवठे
चामोर्शी : प्रचंड उष्णतामान व यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे चामोर्शी वन परिक्षेत्राच्या जंगलातील पाणवठे कोरडे पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी गावाकडे भटकंती सुरू आहे. यावर उपाययोजना म्हणून चामोर्शी वन परिक्षेत्र कार्यालयाने जंगलात २३ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यात वनविभागाच्या टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
चामोर्शी वन परिक्षेत्रांतर्गत २० नियत क्षेत्र असून यात ८० गावांचा समावेश आहे. या वन परिक्षेत्रातील जंगल तसेच वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी एक वन परिक्षेत्राधिकारी, तीन क्षेत्र सहायक, अनेक वनरक्षक व वनमजूर कार्यरत आहेत. यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने मार्च महिन्यापासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. गावानजीक तसेच जंगल परिसरातील अनेक ठिकाणचे तलाव, बोड्या, नाले पूर्णत: कोरडे पडले आहेत. अशा परिस्थितीत चामोर्शी वन परिक्षेत्र कार्यालयामार्फत २३ कृत्रिम पाणवठ्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी चामोर्शीचे वन परिक्षेत्राधिकारी अभय ताल्हन, क्षेत्र सहायक संजय पेंपकवार, आर. के. जल्लेवार, शंकर गुरनुले यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक व वनमजूर सहकार्य करीत आहेत. २३ कृत्रिम पाणवठ्यांमुळे चामोर्शी वन परिक्षेत्राच्या जंगलातील प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
शिकारीवर आळा बसणार

Web Title: Water supply through tanker water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.