पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी होणार

By Admin | Updated: March 22, 2015 00:30 IST2015-03-22T00:30:01+5:302015-03-22T00:30:01+5:30

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील पारडी (कुपी) येथे नळ योजनेचे काम हाती घेण्यात आले.

Water supply scheme inquiry will be done | पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी होणार

पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी होणार

गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील पारडी (कुपी) येथे नळ योजनेचे काम हाती घेण्यात आले. काम अर्धवट असतानाही मूल्यांकन करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर कंत्राटदारास ३५ लाख रूपये अदा केले. या योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबतची लक्षवेधी आ. डॉ. देवराव होळी यांनी विधानसभेत मांडली. यावर सभापतींनी चौकशीसाठी तत्काळ गठित करून चौकशी करण्याचे आदेश दिले.
सन २०११-१२ मध्ये पारडी (कुपी) येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत १ कोटी ३२ लाख ४२ हजार ३०० रूपये किमतीच्या नळ योजनेच्या कामास मान्यता मिळाली. मात्र कंत्राटदाराने केलेल्या पुरवठा विहीर, ऊर्ध्वनलिका, पाण्याची उंच टाकी व गावातील वितरण व्यवस्था आदींबाबत प्रचंड अनियमितता आढळून आल्याचा आरोप आ. डॉ. होळी यांनी विधानसभेत केला. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही. आमदाराने सदर प्रश्न उचलून धरल्यामुळे आता या कामाची चौकशी होणार आहे. त्यामुळे दोषींचे दाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water supply scheme inquiry will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.