वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पाणी टंचाई
By Admin | Updated: March 23, 2015 01:27 IST2015-03-23T01:27:44+5:302015-03-23T01:27:44+5:30
वन कर्मचाऱ्यांसाठी राज्यातील सर्वात मोठी वसाहत आलापल्ली येथू असून या ठिकाणी तब्बल ३०० कर्मचारी निवासस्थानी आहेत.

वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पाणी टंचाई
गडचिरोली : वन कर्मचाऱ्यांसाठी राज्यातील सर्वात मोठी वसाहत आलापल्ली येथू असून या ठिकाणी तब्बल ३०० कर्मचारी निवासस्थानी आहेत. जुनी नळ पाईप लाईन खराब झाल्यामुळे सदर पाईपलाईन क्षतिग्रस्त करून नवीन पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर काम अतिशय संथगतीने असल्यामुळे या वनकर्मचारी वसाहतीत आठवड्यातून एकदा ते दोनदा स्वच्छकाच्या वतीने टँकरच्या सहाय्याने अत्यल्प पाणी पुरवठा केला जात आहे. आलापल्ली येथील वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत डिसेंबरपासूनच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, वडसा, सिरोंचा, भामरागड, आलापल्ली आदी पाच वन विभाग आहेत. आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या तीन वन विभागातील वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत निर्माण करण्यात आली. आलापल्ली येथे वन विभागांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या वसाहतीमध्ये ३०० कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. सर्वात मोठी वसाहत असलेल्या गोल कॉलनीत जुनी नळ पाईप लाईन खराब झाल्यामुळे काढून टाकण्यात आली.