शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

सार्वजनिक व आरओ प्लान्टमधील पाणी नमुन्यांची तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:01 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील पाणी नमुने मोफत तपासून दिले जातात. मात्र नगर पंचायती झाल्यापासून अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार शहरांमधील पाणी नमून्याची चार वर्षांपासून तपासणी करण्यात आली नाही. वर्षातून दोनवेळा सार्वजनिक जलस्त्रोताची तपासणी करणे आवश्यक आहे, मात्र अहेरी उपविभागातील चारही नगर पंचायत प्रशासनाने या महत्त्वपूर्ण बाबीकडे प्रचंड दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांची कारवाई सुरू : प्लान्टधारकांना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व अहेरी या नगर पंचायतीच्या हद्दीतील जलस्त्रोतांची चार वर्षांपासून तपासणीच झाली नसल्याबाबतचे वृत्त लोकमतने बुधवारी प्रकाशित केले. या वृत्ताने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली असून आता पाणी नमूने तपासण्याची कार्यवाही करण्याकरिता अहेरीच्या मुख्याधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत. अहेरी शहरातील सार्वजनिक विहीर, हातपंप व इतर सर्व ठिकाणच्या पाणी स्त्रोताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. शिवाय आरओ प्लान्टमधील पाणी नमुन्यांचीही तपासणी करण्यासाठी संबंधितांना पत्र देण्यात आले.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील पाणी नमुने मोफत तपासून दिले जातात. मात्र नगर पंचायती झाल्यापासून अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार शहरांमधील पाणी नमून्याची चार वर्षांपासून तपासणी करण्यात आली नाही. वर्षातून दोनवेळा सार्वजनिक जलस्त्रोताची तपासणी करणे आवश्यक आहे, मात्र अहेरी उपविभागातील चारही नगर पंचायत प्रशासनाने या महत्त्वपूर्ण बाबीकडे प्रचंड दुर्लक्ष केले. दरम्यान याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच नगर पंचायत प्रशासनामध्ये हालचाली सुरू झाल्या. अहेरी नगर पंचायतीच्या वतीने शहरातील हातपंप, विहिरी मिळून सर्वच पाणी स्त्रोताचे नमुने घेण्यात आले आहे. न.प.च्या हद्दीतील संपूर्ण १०१ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. गुरूवारपर्यंत ११ पाणी नमूने रसायनिक सुक्ष्मजीव तज्ज्ञ, उपविभाग प्रयोगशाळा अहेरी यांच्याकडे प्राप्त झाले होते. उर्वरित नमूने येत्या दोन-तीन दिवसांत टप्प्याटप्प्याने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. या सर्व नमून्यांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल नगर पंचायतीला उपलब्ध करून द्यावा, अहेरी न.पं.च्या मुख्याधिकाºयांनी प्रयोगशाळेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.-तर आरओ प्लान्टची एनओसी रद्द करणारअहेरी नगर पंचायतीच्या हद्दीत पाच ते सहा खासगी आरओ प्लान्ट आहेत. त्यामध्ये शुद्ध व थंड पाणी तयार करून त्याची विक्री केली जाते. अनेक लोक आता कॅनमधील पाणी पिण्यावर भर देत आहेत. मात्र आरओ प्लान्टधारकांनी तेथील पाणी नमुन्याची तपासणी करून घ्यावी. प्रयोगशाळेत तपासणी केल्यास त्याचे प्रमाणपत्र नगर पंचायत कार्यालयात आठ दिवसांच्या आत सादर करावे, असे मुख्याधिकाºयांनी आरओ प्लान्टधारकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. पाणी तपासणीचे प्रमाणपत्र सादर न करणाºया व पाणी तपासणीला बगल देऊन पाण्याचे वितरण करणाºयांचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) रद्द करण्यात येईल. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल, असे अहेरीचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :Waterपाणी