शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

सदोष कामाने रस्त्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 5:00 AM

मुख्य बाजारपेठ परिसरातील पावसाचे तसेच सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा व्हावा, या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून भूमिगत नाल्या बांधल्या. मात्र या नाल्या बांधकाम करताना योग्य उतार ठेवण्यात आला नाही. परिणामी अल्पशा पावसाने रस्त्यावर पाणी जमा होत आहे. या कामावर पालिकेचे लाखो रुपये खर्च झाले. मात्र उद्देश सफल झाल्याचे अजूनही दिसून येत नाही.

ठळक मुद्देनियोजन फेल : भूमिगत नाल्या बांधूनही गांधी वॉर्डात पावसाने रस्ते जलमय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्य बाजारपेठ तसेच गांधी वॉर्ड परिसरात भूमिगत नाल्या बांधण्यात आल्या. मात्र या नाल्या योग्यरित्या बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात गडचिरोलीकरांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. रविवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली शहराला पावसाने झोडपले. परिणामी गांधी वॉर्डातील मुख्य बाजारपेठेतील नाल्या तुडूंब भरून रस्त्यावर पाणी साचले.मुख्य बाजारपेठ परिसरातील पावसाचे तसेच सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा व्हावा, या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून भूमिगत नाल्या बांधल्या. मात्र या नाल्या बांधकाम करताना योग्य उतार ठेवण्यात आला नाही. परिणामी अल्पशा पावसाने रस्त्यावर पाणी जमा होत आहे. या कामावर पालिकेचे लाखो रुपये खर्च झाले. मात्र उद्देश सफल झाल्याचे अजूनही दिसून येत नाही.न.प. प्रशासनाला दरवर्षी विविध योजनेतून केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयाचा निधी प्राप्त होत असतो. मात्र विकास कामाचे योग्य नियोजन करून कामात दर्जा राखला जात नसल्याने शहरातील भूमिगत नाली बांधकाम व इतर कामांची पूर्णत: वाट लागली आहे. शहरातील बहुतांश ठिकाणचे नाली व रस्ते बांधकाम सदोष पध्दतीने झाल्याचा आरोप शहरवासीयांकडून होत आहे. सदोष विकासकामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.न.प. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी नाली व रस्त्याचे बांधकाम केले जाते. मात्र चार ते पाच वर्षापूर्वी बांधलेली नाली फोडून त्या ठिकाणी नव्याने नाली बांधकाम केल्याचाही प्रकार शहरात दिसून येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी नाली बांधकाम होत नसल्याची ओरड शहरवासीयांकडून होत आहे. बाजारपेठ परिसरातीलच रस्त्याची दुरूस्ती व नाली बांधकाम वारंवार केले जात असल्याचे दिसून येते. यापूर्वी ५ सप्टेंबर रोजी शनिवारला अल्पशा पावसाने या रस्त्यावर असेच पाणी साचले होते. मुख्य बाजारपेठेतील दुकानदार व ग्राहकांना या समस्येचा पावसाळ्यात सामना करावा लागतो.डुकर बंदोबस्ताकडे दुर्लक्षनगर परिषद प्रशासनाच्या वतीने दोन ते अडीच वर्षांपूर्वी डुकर बंदोबस्त मोहीम राबविण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही मोहीम पूर्णत: थंडबस्त्यात पडली. गेल्या अनेक दिवसांपासून गोकुलनगर, आशीर्वादनगर, स्नेहनगर, फुलेवॉर्ड व इतर भागात डुकरांचा हैदोस वाढला आहे.

टॅग्स :Rainपाऊस