शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

अतिदुर्गम भागातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबली, पोलिसांकडून थेट पाईपलाईन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 16:38 IST

ग्रामस्थांनी मानले पोलीस दलाचे आभार

गडचिरोली : उपविभाग धानोराअंतर्गत पोलीस मदत केंद्र कटेझरीच्या हद्दीतील अतिदुर्गम, अतिसंवेदनशील मानल्या जाणा-या मौजा गुरेकसा येथील महिलांना पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत होती. जीवघेण्या पायपीटीबरोबरच गावाच्या बाहेर असलेल्या ५० फूट खोल विहिरीतून पाणी काढताना महिलांची दमछाक होत असे. गडचिरोली पोलीस दलाच्या कटेझरी येथील प्रभारी अधिकारी व जवानांना सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी महिलांची ही पायपीट थांबवण्यासाठी गावाबाहेर असणा-या विहिरीवर सबमर्सिबल पंप बसवून तेथून पाणी पाईपलाईनद्वारे थेट गावात आणले.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कटेझरी येथील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी गावाबाहेर असणा-या विहिरीवर सबमर्सिबल पंप बसवून विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे गावात आणण्यासाठी उंच ठिकाणी पाण्याच्या दोन टाक्या बसविण्याचा निर्णय घेतला. त्यातून पाईपद्वारे ग्रामस्थांच्या घरासमोर पाणी पुरवठा करण्याची सोय केली. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा, मौजा गरेकसा येथील बोअरवेल नादुरुस्त असल्याने शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या.

सदर नादुरुस्त बोअरवेल गडचिरोली पोलीस दलाने दुरुस्त केल्याने बोअरवेलच्या माध्यमातून या शाळेत पाणी पुरवठा सुरळीत सुरु झाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य फुलले. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कटेझरी येथील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबवत मौजा कटेझरी येथील घरापर्यत पाणी पोहचविण्याची व्यवस्था केली होती. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गुरेकसा येथील महिलांची पायपीट थांबविल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.ग्रामस्थांनी मानले पोलीस दलाचे आभारमौजा गुरेकसा येथील महिला दारात नळाद्वारे आलेले स्वच्छ पाणी पाहून हरखून गेल्या. आपल्याला स्वप्नातही अशा पद्धतीने घरापर्यंत पाणी येईल असे वाटले नव्हते. पण पोलीस दलामुळे हे शक्य झाल्याचे सांगून त्यांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोमके कटेझरी येथील प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड व कर्मचाºयांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीWaterपाणी