शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील नळाला बसविणार जलमापक यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : स्थानिक नगर परिषदेची विशेष सभा नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : स्थानिक नगर परिषदेची विशेष सभा नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या सभेत शहर विकासाच्या पाच मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे न. प. प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व नळधारकांच्या नळाला जलमापक यंत्र बसविण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

मार्च २०२१ ते डिसेंबर २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीकरिता घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत शहरातील नाल्या सफाई करणे व नालीतील मातीमिश्रित गाळ जमा करून वाहनाद्वारे नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर वाहतूक करण्याच्या कामाकरिता अंदाजपत्रानुसार येणाऱ्या खर्चाचे नियोजन करण्यात आले. बर्ड फ्लू या संसर्गजन्य आजाराचा शहरात प्रादुर्भाव झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून तत्काळ व दीर्घकालीन उपाययोजना करण्याविषयी चर्चा करण्यात आली. शहरामध्ये सध्या प्रगतिपथावर असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाची कामे पूर्ण होण्यापूर्वी प्रक्रियायुक्त सांडपाण्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर आराखडा तयार करण्यासाठी नियोजन करण्यात आले. प्रधानमंत्री आवासयोजना अंतर्गत शासकीय जमीन नियमानुकूल करण्यासाठी गोकुलनगर येथील रामतूर तुकूम सर्व्हे क्र.१३१, आराजी १.७४.०० हे.आर.चौ. मी.शेतीचे स्थानिक मुरूम खदानबाबतचा निस्तार हक्क कमी कारणसाठीचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.

सभेला नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, मुख्याधिकारी संजीव ओव्होड, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, सभापती मुक्तेश्वर काटवे, वर्षा नैताम, प्रशांत खोब्रागडे, नगरसेवक प्रमोद पिपरे, नंदकिशोर काबरा, केशव निंबोड, लता लाटकर, नीता उंदिरवाडे, रमेश चौधरी, सतीश विधाते, भुपेश कुलमेथे, रमेश भुरसे, गुलाब मडावी, वैष्णवी नैताम, अनिता विसरोजवार, रितू कोलते, मंजूषा आखाडे, गीता पोटावी, रंजना गेडाम, संजय मेश्राम, पूजा बोबाटे, वर्षा बट्टे आदी उपस्थित होते.