बामणी आश्रमशाळेतील वॉटर हिटर धूळ खात

By Admin | Updated: December 11, 2014 23:06 IST2014-12-11T23:06:07+5:302014-12-11T23:06:07+5:30

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा कांगावा आदिवासी विकास विभाग नेहमी करीत असतो. मात्र योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने

Water heater in Bamni Ashramshala eat dust | बामणी आश्रमशाळेतील वॉटर हिटर धूळ खात

बामणी आश्रमशाळेतील वॉटर हिटर धूळ खात

रमेश शिवराला - बामणी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा कांगावा आदिवासी विकास विभाग नेहमी करीत असतो. मात्र योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र बामणी येथील शासकीय आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर उघडकीस आले आहे.
सिरोंचा-आलापल्ली मार्गावर बामणी येथे अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. या शाळेत लाखो रूपये किंमतीचे शासनाने २०१३ साली वॉटर हिटर संच पुरविले. मात्र सदर वॉटर हिटर सुरूच झाले नसल्याने या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सध्या कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचे चित्र आहे.
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरीता आदिवासी विकास विभागाने वॉटर हिटर संच योजना कार्यान्वित केली. या योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा कोट्यवधीचा निधी खर्च झाला. मात्र अहेरी प्रकल्पासह गडचिरोली जिल्ह्यातील एकाही शासकीय आश्रमशाळेत वॉटर हिटर संचचा उपयोग होत नसल्याचे दिसून येते. हिवाळ्याच्या दिवसात कडक्याच्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ केल्यास निमोनियासारखे अनेक आजार होण्याची दाट शक्यता असते. मात्र वॉटर हिटर संच कुचकामी ठरले असून विद्यार्थी थंड पाण्यानेच आंघोळ करीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येते. दुर्गम भागात अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असतो. अशावेळी विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी विभागाच्यावतीने आश्रमशाळांमध्ये जनरेटर संचाचीसुविधा करण्यात आली. मात्र बामणी आश्रमशाळेतील जनरेटर संच दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना अंधारातच लघूशंका व शौचास जावे लागत असल्याने धोका आहे.

Web Title: Water heater in Bamni Ashramshala eat dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.