पेंढरीत जलसंधारणाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:32 IST2017-09-25T23:32:32+5:302017-09-25T23:32:50+5:30

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१७-१८ या वर्षात धानोरा तालुक्यातील १४ गावांची निवड करण्यात आली आहे.

Water conservation planning in Piedra | पेंढरीत जलसंधारणाचे नियोजन

पेंढरीत जलसंधारणाचे नियोजन

ठळक मुद्देसिंचनाची कामे करण्यावर भर : शिवारफेरीच्या माध्यमातून केली जलसाठ्यांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१७-१८ या वर्षात धानोरा तालुक्यातील १४ गावांची निवड करण्यात आली आहे. पेंढरी येथे रविवारी जलस्त्रोतांची पाहणी करून जलसंधारणाच्या कामाचे नियोजन करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांच्याही सूचना स्वीकारण्यात आल्या.
पेंढरी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पेंढरीच्या सरपंच दूरदशुना आतला, जिल्हा परिषद सदस्य तथा जलव्यवस्थापन समिती सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, पंचायत समिती रोशनी पवार, छबलला बेसरा, नामदेव लेनगुरे, एकनाथ परचाके, नंदू गावतुरे, महादेव गावडे, सुरेश येरमे, गिरमा जेंगठे उपस्थित होते.
कृषी सहायक दिनेश पानसे यांनी अभियानाची पार्श्वभूमी व महत्त्व तसेच पाण्याचा टाळेबंद गावातील पाण्याची गरज उपलब्ध जलसाठा, आवश्यक पाणी व त्यानुसार करावयाच्या कामाचे नियोजन आदी तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. नायब तहसीलदार डी.आर. भगत, वनपाल, पी.एम. चौधरी, तलाठी एस.के. आडे यांनी विभागाची कामे याविषयीची माहिती दिली. संचालन ग्रामसेवक जयंत मेश्राम यांनी केले. जि. प. सदस्यांनीही मार्गदर्शन केले.

१७ हेक्टरवर मजगीची कामे
जलयुक्त शिवार कार्यक्रमाअंतर्गत कामाचे नियोजन करण्यासाठी गावाच्या सभोवताल शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. पेंढरी शेतशिवारातील चार बोड्या, एक तलाव, तीन सिंचन विहिरी, एक वनतलाव, दोन शेततळे यांची पाहणी करण्यात आली. ग्रामस्थांनी गावतलावातील गाळ काढणे, माती नाल्याचे बांधकाम करणे, १७ हेक्टरवर मजगीची कामे करणे, तीन बोड्यांचे नूतनीकरण करणे, आठ सिंचन विहिरींमधील गाळ काढणे, तीन वनतलावांची दुरूस्ती करणे व एक लघुसिंचाई बंधारा बांधण्याबाबतच्या कामांचे नियोजन करण्यात आले.
धानोरा तालुक्यातील १४ गावांची जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये जलसिंचनाची सुविधा वाढविण्याबरोबरच जलसंधारण करण्याबाबत नियोजन करण्याचे काम गावकºयांच्या मदतीने सुरू झाले आहे.

Web Title: Water conservation planning in Piedra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.