शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पूजनातून जलसंवर्धनाचा संकल्प

By admin | Updated: August 18, 2016 01:37 IST

जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते जलपूजन करून जलसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

योजनेची माहिती : वांगेपल्लीत अप्पर जिल्हाधिकारी तर रेगडीत आमदारांच्या हस्ते पूजन अहेरी/ घोट : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते जलपूजन करून जलसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. अहेरी- तालुक्यातील वांगेपल्ली येथील वनिता डुंगा कोरामी यांच्या शेतात अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. अहेरी उपविभागात सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना एकेरी उत्पन्न घेणे अवघड होते. परंतु कोरामी यांनी निर्माण केलेल्या शेततळ्याकडे पाहता, प्रत्येक शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ घेऊन आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. जी. तांबे, उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, तहसीलदार पुरके, नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, न. पं. उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, नगरसेविका मालू इष्टाम, रेखा सडमेक, माया बिटपल्लीवार, दामोधर सिडाम, वाघमारे, आर. एस. गोरे, पी. के. शंभरकर, सचिन जाधव, के. एस. लोनडगले, महेश इंगळे, सचिन गोमासे उपस्थित होते. घोट - रेगडी येथील कन्नमवार जलाशयात आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. परंतु पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून १४ गावातील प्रतिनिधींनी आ. डॉ. देवराव होळी यांना अटकाव केला. परंतु आ. डॉ. होळी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन केशव खोब्रागडे, मोतिराम लाटेलवार, गणेश कांदो, गोपीनाथ बकावार, गुरूदास पालकवार यांना दिले. त्यानंतर आ. डॉ. देवराव होळी यांनी धरणाचे वक्र गेट फिरवून पाणी सोडले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज पालारपवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, पं. स. उपसभापती मंदा दुधबावरे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, साबांविचे उपविभागीय अभियंता गावळ, सिंचाई विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही. जी. आदेवार, लांडगे, साईनाथ बुरांडे, तुरे, नेवारे, दुधबावरे, नेवारे, शहा, उपाध्ये हजर होते.