जिकडे तिकडे पाणीच पाणी

By Admin | Updated: July 16, 2014 00:09 IST2014-07-16T00:09:05+5:302014-07-16T00:09:05+5:30

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५९.०५ मिमीच्या सरासरीने ७१४.१ मिमी पाऊस झाल्याने कठाणी, इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगौतम यासह अनेक नद्या व नाले दुथळी भरून वाहत आहे.

Water and water | जिकडे तिकडे पाणीच पाणी

जिकडे तिकडे पाणीच पाणी

शेतकरी सुखावला : कठाणीसह अनेक नद्या फुगल्या; धानोरा तालुक्यातील दोन मार्ग बंद
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५९.०५ मिमीच्या सरासरीने ७१४.१ मिमी पाऊस झाल्याने कठाणी, इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगौतम यासह अनेक नद्या व नाले दुथळी भरून वाहत आहे. यामुळे धानोरा तालुक्यात तीन मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी ९ वाजतापासून धानोरा-गडचिरोली मार्गावरची वाहतूक रांगी नाल्यावर पाणी चढल्याने बंद झाली. या नाल्यावर ४ ते ५ फूट पाणी चढले होते. तसेच धानोरा-मुरूमगाव-राजनांदगाव हा मार्गही कठाणी नदीला पूर आल्याने वडगाव, बेलगाव येथे बंद झाला होता. तसेच धानोरा-रांगी-आरमोरी हा मार्गही सोडे गावाजवळ कठाणी नदीला पूर आल्याने बंद झाला होता. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मुरूमगाव मार्ग खुला झाला. राजनांदगाववरून दोन बसगाड्या धानोरा येथे येऊन थांबल्या. मात्र अन्य दोन मार्गावरची वाहतूक बंदच होती. गडचिरोली शहरातही रात्रभर पाऊस असल्याने मुख्य मार्गालगतचे अंतर्गत रस्ते जलमय झाले होते. पोलीस ठाण्यामध्येही पाणी साचले. तसेच भातगिरणीकडे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाहत होता. कन्नमवार नगरमध्ये राधे बिल्डींगच्या मागे सर्व परिसर जलमय झाला होता. नगर परिषद परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. भामरागड तालुक्यालगत छत्तीसगड राज्यातही संततधार पाऊस असल्याने भामरागड येथील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली होती. गडचिरोली शहरासारखीच अन्य तालुका शहराची स्थिती होती. दमदार पावसामुळे गडचिरोली शहरातील नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या.

Web Title: Water and water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.