जल व वन संवर्धन करणे गरजेचे -अशोक नेते
By Admin | Updated: January 18, 2017 01:44 IST2017-01-18T01:44:31+5:302017-01-18T01:44:31+5:30
जगामध्ये हवामान बदलत आहे त्यामुळे आपल्या मातृभूमीला प्रचंड त्रास होत आहे.

जल व वन संवर्धन करणे गरजेचे -अशोक नेते
गोविंदपुरात कार्यक्रम : रासेयो शिबिराचा समारोप
गडचिरोली : जगामध्ये हवामान बदलत आहे त्यामुळे आपल्या मातृभूमीला प्रचंड त्रास होत आहे. समाजामध्येसुद्धा बदल घडून येत आहेत. त्यामुळे मानवाने जल व वनसंवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खा. अशोक नेते यांनी केले.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप गोविंदपूर येथे नुकताच झाला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर विशेष अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश अर्जुनवार होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी न. पं. सभापती प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, नंदकिशोर काबरा, गोवर्धन चव्हाण, पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर, विलास भांडेकर, सरपंच गीता सोमनकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी, प्रकाश अर्जुनवार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. प्रमोद सहारे, संचालन प्रा. राजन बोरकर यांनी केले तर आभार प्रा. संजू गोंगले यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)