सांडपाण्याच्या दुर्गंधीने सारेच त्रस्त

By Admin | Updated: February 22, 2015 01:17 IST2015-02-22T01:17:29+5:302015-02-22T01:17:29+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गेल्या तीन-चार महिन्यांपासून घाण पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे.

Wasted cravings for everyone | सांडपाण्याच्या दुर्गंधीने सारेच त्रस्त

सांडपाण्याच्या दुर्गंधीने सारेच त्रस्त

गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गेल्या तीन-चार महिन्यांपासून घाण पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. याकरिता रूग्णालयाच्या आंतर विभागाच्या प्रवेशद्वारासमोर खोदकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी घाण पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रूग्ण, नातेवाईक तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तोंडाला रूमाल बांधून वावरावे लागत असल्याचे चित्र दिसून आले.
येथील पुरूषाच्या वार्ड क्रमांक १ मधील शौचालय व प्रसाधन गृहात पाण्याची व्यवस्था दिसून आली. पुरूष वैद्यकीय कक्ष क्रमांक ८ मधील प्रसाधन गृहात कचरा अस्ताव्यस्त पडून असल्याचे दिसून आले. शस्त्रक्रिया कक्षामधील बाहेरच्या भागात असलेल्या शौचालयात शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांचे अस्वच्छ कपडे राळवर टांगलेल्या स्थितीत दिसून आले. अपघात कक्षामध्ये रूग्णांच्या खोलीत कचरा पडलेला होता.
रूग्णालयाच्या वार्डात सफाई कर्मचारी रोज येऊन शौचालय व प्रसाधन गृहाची स्वच्छता करतात. बादलीतील टाकाऊ अन्न रोज बाहेर फेकल्या जाते. वार्डात आवश्यक तेवढी स्वच्छता केली जात आहे.
- दीपा चचाणे, रूग्ण, वार्ड क्रमांक ७
वादळी पावसामुळे शुक्रवारच्या रात्री तीन-चारदा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे त्रास झाला. सकाळच्या सुमारास सफाई कर्मचारी वार्डात आले व त्यांनी वार्डाची स्वच्छता केली. याशिवाय शौचालय व प्रसाधन गृहाची स्वच्छता केली.
- संगिता भरडकर, रूग्ण, आयसोलेशन विभाग
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांडपाण्याची विल्हेवाट होण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी खोदकाम करण्यात आल्यामुळे रूग्णालयाच्या समोरील परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे वस्तूनिष्ठ स्वरूपाची स्वच्छता होऊ शकत नाही. अशाही परिस्थितीत सर्व वार्डात दैनंदिन स्वच्छता केली जाते.
- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली

Web Title: Wasted cravings for everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.