ताेट्यांअभावी पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST2021-07-26T04:33:08+5:302021-07-26T04:33:08+5:30
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील ...

ताेट्यांअभावी पाणी वाया
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. नगर परिषदेने नळधारकांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात रॉकेल मिळण्यास अडचण
आलापल्ली : जिल्ह्यात अवैधरीत्या रॉकेलची सर्रास विक्री होत असली तरी ग्रामीण भागात अनेक नागरिकांना राॅकेल मिळत नसल्याचे दिसून येेते. अनेक रॉकेल दुकानदार गैरमार्गाने रॉकेल विकत आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाने संबंधितांवर कारवाई करावी.
कठडे लावण्यास दिरंगाई
चामोर्शी : अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. या मार्गावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची वर्दळ असते, तसेच सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. कठडे नसल्याने अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माेकाट श्वानांमुळे धाेका
कमलापूर : दिवसेंदिवस शहरात मोकाट श्वानांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेक वेळा नगर पंचायतीकडे केली आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्षच होत आहे.
एटापल्लीत अतिक्रमण
एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत, तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे; परंतु या मागणीकडे लक्ष दिले जात नाही.
खुटगावचे निवाराशेड जीर्ण
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवारा शेडच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या त्याची दुरवस्था झाली आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.
चातगाव-रांगी मार्गाचे रुंदीकरण करा
चातगाव : चातगाव-रांगीमार्गे माेठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. सध्या हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मार्गाचे रुंदीकरण लवकर करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे. रस्ता अरुंद असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.