धान्य वाटप बंद करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:50+5:302021-04-21T04:36:50+5:30
जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे. काेराेनामुळे मृत्युमुखी पडलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या वारसानाच शासकीय नाेकरी द्यावी. राजस्थान ...

धान्य वाटप बंद करण्याचा इशारा
जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे. काेराेनामुळे मृत्युमुखी पडलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या वारसानाच शासकीय नाेकरी द्यावी. राजस्थान सरकारप्रमाणे तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी. काेराेनाचे संकट लक्षात घेता ई-पाॅस मशीनच्या मदतीने धान्य वाटप करताना धान्य दुकानदारांचे थम्ब अधिप्रमाणित करून धान्य वाटप करण्यात यावे. धान्य वाटप करताना एका क्विंटलमागे जवळपास दीड किलाे घट येते. ही घट ग्राह्य धरण्यात यावी. शासकीय धान्य गाेदामातून ५० किलाे ५८० ग्रॅम वजनाचे धान्य भरलेले पाेते देण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कराव्यात. शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा किंवा फूड प्राेग्रॅम अंतर्गत २७० रुपये प्रतिक्विंटल कमिशन द्यावे. भंगार झालेल्या ई-पाॅस मशीन बदलून नवीन मशीन देण्यात याव्यात, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सत्यफुला डाेर्लीकर, जिल्हा सचिव अनिल भांडेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बाॅक्स...
थकीत कमिशन द्या
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन थकीत आहे. हे कमिशन देण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानदारांची हमालीच्या नावाखाली लूट केली जाते. हमालीची रक्कम वाहतूक कंत्राटदाराकडून वसूल करावी, या मागण्या मान्य न झाल्यास १ मे पासून धान्याचे वितरण केले जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.