जागोजागी आहेत कचऱ्याचे ढीग
By Admin | Updated: November 9, 2014 23:21 IST2014-11-09T23:21:21+5:302014-11-09T23:21:21+5:30
गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते

जागोजागी आहेत कचऱ्याचे ढीग
देसाईगंज : गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते व नगराध्यक्ष तसेच भाजप पदाधिकारी यांनी झाडू मारून केली मात्र सध्या देसाईगंज नगर पालिकेची स्वच्छता अभियानाविषयी उदासिनता असल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. ग्रामीण भागात केवळ फोटो सेशनसाठीच हे अभियान सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
स्वच्छतेकरीता केंद्रशासनापासून तर राज्य शासन देखील जनजागृती करीत असले तरी लोकसहभागामुळे अभियानाला तडा जात आहे़
देसाईगंज शहरात १७ वॉर्ड आहेत. यातील अनेक वॉर्ड ग्रामीण भागातील आहेत. या शहरात कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट केली जात नाही. केवळ एक दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रेल्वे स्थानकाचा परिसर झाडून फोटो सेशन कार्यक्रम झाला. त्यानंतर सारे अलबेल झाले आहे. देसाईगंज शहराच्या आरमोरी मार्गावर तर नगरपालिकेने अघोषीत डस्टयार्ड बनविले आहे़ अभियानात स्वच्छता करीत असतांना गाव स्वच्छ केले जाते. मात्र गावातील कचरा चौकात आणून ठेवला जात असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. गावातील, शहरातील अस्वच्छता आम्ही दूर करणार असल्याची ग्वाही अभियानादरम्यान झाडू पकडतांना कार्यकर्ते देतात़ मात्र कार्यक्रम संपताच झाडू रस्त्यावर फेकला जाते.
ग्रामीण भागातील हागणदारी, अस्वच्छता, गलिच्छता दुर करण्यासाठी महाराष्ट्रात तरी कठोर उपाय योजना करण्याची गरज भासत आहे़ घरी शौचालय असतांना देखील ग्रामीण भागात अजूनही उघडयावरच शौचास बसण्याच्या सवय लागलेली आहे़ शहरी तसेच ग्रामीण भागाला अशा अनेक समस्येने ग्रासले आहे़ सर्वसामान्या सोबतच नगरपालिका किंवा ग्रामपंचायत देखील अस्वच्छतेची समस्या वाढीला कारणीभुत आहेत़ स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती होणे आवश्यक आहे. फोटो सेशन करण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वच्छतेची जाण ठेऊन काम करण्याची गरज पर्यावरणवादी व्यक्त करीत आहे.