स्वच्छतागृह उदघाटनाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: July 9, 2014 23:27 IST2014-07-09T23:27:27+5:302014-07-09T23:27:27+5:30
अहेरी बसस्थानकाच्या जुन्या स्वच्छतागृहाची अवस्था दयनिय झाली होती. याबाबतचे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. लोकमतच्या पाठपुराव्यामुळे गतवर्षी बसस्थानक परिसरात

स्वच्छतागृह उदघाटनाच्या प्रतीक्षेत
अहेरी : अहेरी बसस्थानकाच्या जुन्या स्वच्छतागृहाची अवस्था दयनिय झाली होती. याबाबतचे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. लोकमतच्या पाठपुराव्यामुळे गतवर्षी बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी सुलभ शौचालय व स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या शौचालय व स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले नाही. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
अहेरी उपविभागात अहेरी येथे एकमेव मोठे बसस्थानक आहे. या आगारातून आलापल्ली, बल्लारशाह, अहेरी, सिरोंचा, भामरागड व छत्तीसगडकडे अनेक प्रवासी आवागमन करतात. या बसस्थानकात प्रवाशांची संख्या मोठी असते. मात्र या बसस्थानकांमध्ये प्रवाशांसाठी शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नाही. या परिसरातील जुने शौचालय व स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन गतवर्षी लाखो रूपये खर्च करून येथे नवे शौचालय व स्वच्छतागृह बांधण्यात आले. मात्र सदर शौचालय व स्वच्छतागृह उद्घाटनाअभावी कुलूपबंदच आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आगार प्रशासनाने शौचालय सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. या बसस्थानकात महिला प्रवाशांची संख्या मोठी असते. महिलांसाठी या ठिकाणी स्वतंत्र शौचालय नाही. (प्रतिनिधी)