शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

कर्जेली गावाला रस्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:38 AM

छत्तीसगड राज्याच्या सीमलेगत असलेल्या कर्जेली गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावाच्या दोन्ही बाजूला नाले असून या नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा जगाशी संपर्क तुटतो.

ठळक मुद्देपुलाअभावी पावसाळ्यात तुटतो संपर्क : परिसरात विद्युत जोडणीच्या कामाला गती

ऑनलाईन लोकमतजिमलगट्टा : छत्तीसगड राज्याच्या सीमलेगत असलेल्या कर्जेली गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावाच्या दोन्ही बाजूला नाले असून या नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा जगाशी संपर्क तुटतो.कर्जेली गावात जवळपास ७० कुटुंब वास्तव्याने आहेत. वीज नसल्याने गावात सौरदिव्यांचे वाटप करण्यात आले होते. मात्र सौरदिवे बंद पडले असून आता केवळ त्याचे खांब शिल्लक आहेत. स्थानिक नागरिकांनी विजेचा पुरवठा करण्याबाबत वेळोवेळी मागणी केल्यानंतर गावाला वीज पुरवठा करण्याचे काम सुरू झाले आहे. खांब उभारण्यात आले असून वीज तारा लावल्या जात आहेत. रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, कोर्ला या गावात ट्रॉॅन्सफॉर्मर बदलवून विद्युत खांब टाकणे सुरू झाले आहे. कामाची गती लक्षात घेतली तर पावसाळ्यापूर्वी कर्जेली, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, कोर्ला ही गावे उजाडण्याची शक्यता आहे.गावात वीज येत असल्याचे आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर असले तरी रस्त्यांची दयनीय अवस्था बघून मन खिन्न होत आहे. कर्जेली परिसरात असलेल्या इतरही अनेक गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. देचलीपेठा, मेटीगुडम, बिराडघाट, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, मुकनपल्ली, आसली, कोंजेड, कल्लेड या गावांना अजूनही डांबरी रस्त्याची प्रतीक्षा आहे. शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सोयीसुविधांसाठी गावकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे.ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचा दावा शासनाकडून करण्यात येत असला तरी कर्जेली परिसरातील असंख्य गावे मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या भागाच्या विकासाकडे लक्ष घालून विकासाच्या योजना राबवाव्या, अशी मागणी कर्जेलीसह इतर गावातील नागरिकांकडून केली जात आहे.