१०८ रुग्णवाहिकेसाठीही करावी लागते वेटींग; दरदिवशी ९० काॅल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST2021-04-19T05:00:00+5:302021-04-19T05:00:31+5:30

सर्वसाधारण स्थितीतील काेराेना रुग्णाला काेविड केअर सेंटरवर भरती केले जाते. त्याची प्रकृती बिघडल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागते. तर तालुकास्तरावरील रुग्णालयात सुविधा नसल्यास जिल्हास्तरावर हलवावे लागते. साेबतच इतर आजारांचे रुग्णसुद्धा भरती करावे लागत असल्याने ॲम्ब्युलन्सवरील कामाचा भार वाढला.

Waiting for 108 ambulances; 90 calls per day | १०८ रुग्णवाहिकेसाठीही करावी लागते वेटींग; दरदिवशी ९० काॅल्स

१०८ रुग्णवाहिकेसाठीही करावी लागते वेटींग; दरदिवशी ९० काॅल्स

ठळक मुद्देकाेराेनामुळे रेफरची संख्या वाढली

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा भार रुग्णवाहिकेवरही पडत चालला आहे. काेराेनाच्यापूर्वी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी गडचिराेली जिल्ह्यातून दिवसभरात ३० ते ४० काॅल्स येत हाेते. आता मात्र दिवसाला जवळपास ९० काॅल्स येत आहेत. काॅल केल्यानंतर रूग्णवाहिका एक ते दाेन तासाने उपलब्ध हाेते. 
सर्वसाधारण स्थितीतील काेराेना रुग्णाला काेविड केअर सेंटरवर भरती केले जाते. त्याची प्रकृती बिघडल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागते. तर तालुकास्तरावरील रुग्णालयात सुविधा नसल्यास जिल्हास्तरावर हलवावे लागते. साेबतच इतर आजारांचे रुग्णसुद्धा भरती करावे लागत असल्याने ॲम्ब्युलन्सवरील कामाचा भार वाढला.

दीड महिन्यात १,४०२ काेराेना रुग्णांची वाहतूक
१ मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत जिल्हाभरातील १,४०२ काेराेना रुग्णांची वाहतूक करण्यात आली आहे. तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर काेराेना रुग्णाला भरती करण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर सर्वाधिक हाेत आहे. 

आश्रमशाळांच्या रुग्णवाहिका आराेग्य सेवेत
 सिराेंचा तालुक्यातील बामणी, अहेरी तालुक्यातील खमनचेरू, मुलचेरा, एटापल्ली, चामाेर्शी तालुक्यातील मार्कंडादेव, गडचिराेली येथील इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा, मुरूमगाव व रामगड येथील आठ आश्रमशाळांमध्ये आदिवासी विकास विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. आश्रमशाळांना सुट्या असल्याने या रुग्णवाहिका आराेग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. 
तालुका ते जिल्हास्तरावर रूग्णवाहिका काेराेना रूग्णांची वाहतूक करण्यात व्यस्त राहत असल्याने अपघात व इतर राेगांच्या रूग्णांसाठी वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध हाेत नाही.

जिल्ह्यात केवळ १० रुग्णवाहिका
जिल्ह्यात केवळ १० रुग्णवाहिका आहेत. यामध्ये ८ बेसिक लाईफ सपाेर्ट आणि २ ॲडव्हान्स लाईफ सपाेर्ट रुग्णवाहिका आहेत. ॲडव्हान्स लाईफ सपाेर्ट रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर व शाॅक देण्याची मशीन उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयात २ रुग्णवाहिका, महिला रुग्णालय गडचिराेली येथे १ रुग्णवाहिका, काेरची, कुरखेडा, सिराेंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व आरमाेरी येथे प्रत्येकी १ रुग्णवाहिका उपलब्ध आहे. जिल्ह्याचा व्याप लक्षात घेता रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. आश्रमशाळांच्या ८ रुग्णवाहिका आराेग्य विभागाकडे तात्पुरत्या हस्तांतरित केल्याने काेराेनाच्या रुग्णांची वाहतूक हाेण्यास हातभार लागत आहे. 

 

Web Title: Waiting for 108 ambulances; 90 calls per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.