शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीचा जलस्तर घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 01:22 IST

देसाईगंज, गडचिरोली नगर पालिकांसह जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना असलेल्या वैनगंगा नदीचा जलस्तर ....

पाणी संकट गंभीर होणार : इनटेक वेलकडे नदीचा प्रवाह वळविण्यासाठी बांधला बांध गडचिरोली : देसाईगंज, गडचिरोली नगर पालिकांसह जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना असलेल्या वैनगंगा नदीचा जलस्तर एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच घसरला आहे. त्यामुळे गडचिरोली शहराच्या पाणी पुरवठ्यावर याचा थेट परिणाम झाला असून वैनगंगेवर अवलंबून असणाऱ्या बहुतांशी पाणी पुरवठा योजनांना वैनगंगेचा जलस्तर आटल्याने पाण्याचे संकट आता भेडसावू लागले आहे. यामुळे गडचिरोली नगर पालिकेच्या प्रशासनाने पदाधिकाऱ्यांसह वैनगंगा नदीच्या परिसराची पाहणी करून तत्काळ नदीच्या पाणी असणाऱ्या भागावर बांध बांधून टाकीच्या बाजूला पाणी वळविण्यासाठी उपाययोजना केली आहे. गडचिरोली शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या घरात असून दर दिवशी ६२ लाख लिटर पाणी शहराला लागते. याशिवाय इतर २५ गावातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनाही वैनगंगेच्याच जलस्तरावर अवलंबून आहेत. नदीचे पात्र आटल्यामुळे गडचिरोली शहराच्या फुले वार्ड, वंजारी मोहल्ला आदी भागाला गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही व शहराच्या इतर भागातही अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने वैनगंगेचा जलस्तर इनटेकवेलकडे वळविला आहे. इनटेकवेलमध्ये पाणी जाण्यासाठी नदी पात्रात विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीमध्ये दोन मोठमोठ्या पाईपच्या सहाय्याने पाणी जाते. मात्र नदीची धार आटल्याने यातील एक पाईप पूर्णपणे बाहेर निघाले तर दुसरे पाईप अर्धेच नदीमध्ये बुडून होते. अर्ध्या पाईपातून इनटेक वेलमध्ये पुरेसे पाणी जात नसल्याने जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत अपुऱ्या पाण्याचा पुरवठा होत होता. नदीची धार आटली असल्याची बाब नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह पाहणी केली. गुरूवारी नदीमध्ये तात्पुरते बांध बांधून इनटेक वेलच्या बाजूने पाणी वळते केले आहे. उष्णतामान वाढत राहिल्यास एप्रिल अखेरपर्यंत जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)