पाच महिन्यांपासून वेतन थकले
By Admin | Updated: May 3, 2015 01:10 IST2015-05-03T01:10:15+5:302015-05-03T01:10:15+5:30
ग्रामीण भागात अंगणवाडी कर्मचारी नियमित सेवा बजावत आहेत. मात्र त्यांना अल्पश: मानधन देऊन त्यांची बोळवण केली जात आहे.

पाच महिन्यांपासून वेतन थकले
सिरोंचा/अहेरी : ग्रामीण भागात अंगणवाडी कर्मचारी नियमित सेवा बजावत आहेत. मात्र त्यांना अल्पश: मानधन देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. केंद्र व राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेकडो आश्वासने जनतेला दिली. मात्र त्यांची पूर्तता अद्यापही झाली नाही. जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन मागील पाच महिन्यांपासून अडले आहे. त्यामुळे त्वरित निकाली काढावे, अशी मागणी सिरोंचा, अहेरी येथील मेळाव्यात कर्मचाऱ्यांनी केली.
सिरोंचा येथे पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नागुबाई मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे, डी. एस. वैद्य, यशोदा दुर्गे उपस्थित होत्या. तेलंगणा राज्यात अंगणवाडी महिलांच्या मानधनात सरकारने वाढ केली. राज्य शासनाच्या वतीने त्यांना साडेचार हजार रूपये देण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्रात दोन हजार रूपयेही मानधन देण्यास शासन हतबल आहे, असे प्रतिपादन सुमन तोकलावार यांनी केले. सरकारने काळा पैसा तर आणला नाहीच, शिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही अन्यायपूर्ण वागणूक दिली आहे, असे प्रतिपादन दहिवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पुष्पा बैलवार यांनी मानले. खैकुन शेख, शफिया सय्यद, मुक्ता कोंडी, शोभा गोर्लावार, मंगला रोडावार, सविता ओल्लालवार, जीजाबाई गुरनुले, सुनंदा पुजारी, चंद्रा रंगारी यांनी सहकार्य केले.
अहेरी प्रकल्पातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी सी-टू संघटनेच्या नेतृत्त्वात बालविकास प्रकल्प अधिकारी रत्नमाला मेश्राम यांना निवेदन दिले.
सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा, थकीत टीए, इंधन बिल त्वरित द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शासनाकडून निधी प्राप्त होताच बिल दिले जाईल, असे आश्वासन मेश्राम यांनी दिले. निवेदन देताना रमेशचंद्र दहिवडे, मंगला मोहुर्ले, डी. एस. वैद्य, विठाबाई भट, एनप्रेड्डीवार, येनगंटीवार, वडलाकोंडावार, दुर्गे हजर होत्या. (तालुका प्रतिनिधी)