गिधाड पर्यावरणाचे स्वच्छतादूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:48 IST2017-09-02T21:48:40+5:302017-09-02T21:48:56+5:30

मृत जनावरांचे मांस हेच गिधाडांचे खाद्य असल्याने मृत जनावरांपासून होणारे विविध आजार कमी करण्याचे काम गिधाड करतात.

Vulture Environmental Cleaner | गिधाड पर्यावरणाचे स्वच्छतादूत

गिधाड पर्यावरणाचे स्वच्छतादूत

ठळक मुद्देसोनल भडके यांचे प्रतिपादन : दर्शनी चक येथे गिधाड जनजागृती दिन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मृत जनावरांचे मांस हेच गिधाडांचे खाद्य असल्याने मृत जनावरांपासून होणारे विविध आजार कमी करण्याचे काम गिधाड करतात. गिधाडांमुळे स्वच्छता राखण्यासही फार मोठी मदत होते. मात्र गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावा, असे आवाहन सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांनी केले.
सप्टेंबर महिन्यातील पहिला शनिवार आंतरराष्टÑीय गिधाड जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त गडचिरोली तालुक्यातील दर्शनी चक येथे शनिवारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला कुनघाडाचे वन परिक्षेत्राधिकारी जी. एम. घोंगडे, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, दर्शनी मालच्या सरपंच शोभा कोठारे, नवेगाव रै.च्या सरपंच उषा दुधबळे, मुख्याध्यापिका कुमरे, अंजली कुळमेथे, दिलीप भांडेकर, उपसरपंच उमाजी पिपरे, नैताम, माजी सरपंच पत्रू कोठारे, दिनकर दुधबळे, सुधाकर वैरागडे, जयदेव कोठारे, वनपाल तथा केंद्रस्त अधिकारी मोतीराम चौधरी, वनपाल सालकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सोनल भडके म्हणाल्या, डायक्लोफेनॅक औषधे, रासायनिक खते, कीटक नाशके व मानवी चुकांमुळे गिधाड नष्ट होत चालले आहेत. गिधाड मृतभक्षी असल्याने मृत जनावरांपासून होणारे अ‍ॅनथ्रेक्स, कॉलरा, रेबीज आदी आजार टाळले जातात. त्यामुळे गिधाडांचे संवर्धन करावे, असे आवाहन केले. संचालन वनपाल विशाल सालकर, तर आभार वनरक्षक चंदू डोईजड यांनी मानले. यशस्वीतेसाठी वनरक्षक तलमले, ढोणे, पेदीवार, टेकाम, आंबेडारे, गोटा यांनी सहकार्य केले. याप्रसंगी गिधाड संवर्धनाबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली.

Web Title: Vulture Environmental Cleaner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.