ई-इपिकवर मिळणार मतदार ओळखपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:08 IST2021-02-06T05:08:14+5:302021-02-06T05:08:14+5:30
गडचिराेली : भारत निवडणूक आयाेगाने २५ जानेवारी २०२१ या अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी ई-इपिक या सुविधेची सुरुवात केली ...

ई-इपिकवर मिळणार मतदार ओळखपत्र
गडचिराेली : भारत निवडणूक आयाेगाने २५ जानेवारी २०२१ या अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी ई-इपिक या सुविधेची सुरुवात केली आहे. २५ जानेवारी राेजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी काही नवीन मतदारांनी नाेंदणी केली. त्यांचे ओळखपत्र राष्ट्रीय मतदाता सेवा पाेर्टलवरून डाऊनलाेड करून घेतले आहे. मतदारांची माेठ्या प्रमाणात मागणी हाेत असल्याने या प्रणालीवरील भार वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन नवीन नाेंदणी झालेल्या मतदारांना प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या नवीन मतदारांनी नाेंदणी केली आहे, त्या मतदारांना फेब्रुवारी २०२१ पर्यंत पाेर्टलवरून ई-इपिक डाऊनलाेड करता येईल. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम २०२१ पूर्वी नाेंदणी झालेल्या व याेग्य दूरध्वनी क्रमांक असलेल्या मतदारांना ई-इपिक डाऊनलाेड करण्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे. भारत निवडणूक आयाेगाच्या पाेर्टलवरून ई-इपिक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.