लाहेरी, उडेरा व कुनघाडा (रै.) येथे मतदार जनजागृती कार्यक्रम

By Admin | Updated: February 11, 2017 02:02 IST2017-02-11T02:02:00+5:302017-02-11T02:02:00+5:30

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै.), एटापल्ली तालुक्यातील उडेरा व भामरागड तालुक्यातील लाहेरी

Voter awareness program at Lahheri, Udera and Kunghada (Rd.) | लाहेरी, उडेरा व कुनघाडा (रै.) येथे मतदार जनजागृती कार्यक्रम

लाहेरी, उडेरा व कुनघाडा (रै.) येथे मतदार जनजागृती कार्यक्रम

गावातून काढली रॅली : तहसील कार्यालय व शाळांचा उपक्रम
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै.), एटापल्ली तालुक्यातील उडेरा व भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे मतदार जनजागृती निमित्त रॅली काढण्यात आली.
एटापल्ली येथून जवळच असलेल्या उडेरा येथील श्री स्वामी समर्थ प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने शुक्रवारी गावातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांच्या मदतीने लोकशाहीमध्ये मतदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, असे आवाहन केले. सदर रॅली मुख्याध्यापक एस. आर. बोरकर, तलाठी ए. व्ही. नागरगोजे, योडपल्लीवार, व्ही. टी. चांदेकर, पडवेकर, निकुले, शेख, रंगुवार, आडेपू, येनगंटीवार, पिंपळशेंडे, चंदे, मडपती, गहाने यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली.
चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै.) येथे तालुका प्रशासन व विश्वशांती कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालय तथा स्व. वामनराव गड्डमवार कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. तहसीलदार देवेंद्र दहीकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी मंडळ अधिकारी जे. के. काझी, तलाठी चाटे, अनिकेत चव्हाण, पुंडलिक भांडेकर, प्रा. संतोष सुरपाम, प्रा. सुरेश मुलमुले, प्रा. डी. बी. मेश्राम, अशोक कुनघाडकर आदी उपस्थित होते.
भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेच्या वतीने गुरूवारी मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. तहसील नरेंद्र देशमुख, माधव निलावड, तलाठी रेणुका करंबे, ग्रामसेवक कुंटावार, मुख्याध्यापक उराडे, सरपंच पिंडा बोगामी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी, सुरेश सिडाम, रमेश घोगरे, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुधीर घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र देशमुख यांनी मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजाविण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक रेणुका करंबे, बोकडे तर आभार गिल यांनी मानले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Voter awareness program at Lahheri, Udera and Kunghada (Rd.)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.