मतदार जागृतीचा जोर वाढला
By Admin | Updated: October 1, 2014 23:23 IST2014-10-01T23:23:10+5:302014-10-01T23:23:10+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान करावे, या उद्देशाने जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमार्फत मतदार जागृती मोहीम राबविली जात आहे. मतदार जागृतीचा

मतदार जागृतीचा जोर वाढला
गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान करावे, या उद्देशाने जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमार्फत मतदार जागृती मोहीम राबविली जात आहे. मतदार जागृतीचा जोर सध्या अनेक भागात वाढत आहे.
गडचिरोली - स्थानिक शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने शहरात मतदार जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीचा प्रारंभ प्राचार्य गडसुलवार यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. रॅली तहसील कार्यालय परिसरातून रेड्डीगोडाऊनमार्गे काढण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. विविध घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जागृती केली. रॅलीत प्रा. वंदना गावंडे, अर्चना कोयलवार, प्रा. शेखर गडसुलवार, प्रा. सुबोध साखरे, प्रा. राकेश इनकने, प्रा. दुर्गम, विनोद रोहणकर, सी. एन. शेट्टे, एस. एच. वाटेकर, राकेश संतोषवार, प्रविण कांबळे, के. एन. हवलादार यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.
देसाईगंज - देसाईगंज येथे मतदार जागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार उपेश अंबादे, नायब तहसीलदार धाईत, नायब तहसीलदार मडावी, नायब तहसीलदार शेख यांच्यासह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान करावे, असे आवाहन चरडे यांनी केले. यावेळी रॅलीच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली.
कोरची - स्थानिक वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकारी प्राचार्य एस. एस. दोनाडकर, प्रा. पी. के. चापले, प्रा. रोटके, प्रा. मांडवे, प्रा. चटारे, रूखमोडे, श्रीरामे यांच्यासह रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी गृहभेटीच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी मतदार जागृती केली.
चामोर्शी - स्थानिक कृषक हायस्कूलच्यावतीने स्विप मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यावेळी शिक्षण संस्थेचे सदस्य एकनाथ लटारे, मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, संजय कुनघाडकर, लोमेश्वर पिपरे, मोरेश्वर गडकर, वर्षा लोहकरे, जासुंदा जनबंधु, लालाजी कुनघाडकर, देवराव चलाख, राजु भांडेकर, विनायक वाघाडे, संचित कुंभरे, पुंडलिक मुळे, दिलीप वाघाडे, सुनंदा दुधबळे, देवराव चलाख, एकनाथ बोदलकर, दिलीप भांडेकर, लोमेश बुरांडे, गिरीश मुंजमकर, प्रकाश मठ्ठे, अरूण दुधबावरे, मारोती दिकोंडवार आदी रॅलीत सहभागी झाले होते.
आरमोरी - स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या मतदार जागृती रॅलीत संस्थेचे सहसचिव हरिशचंद्र बोंदरे, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, उपप्राचार्य गौतम, प्रा. बगडे, प्रा. गोरे, प्रा. बगमारे, प्रा. गायकवाड, प्रा. बोरकर, प्रा. ढेंगळे, चट्टे सहभागी झाले होते.
मानापूर/देलनवाडी - स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या मतदार जागृती रॅलीत तलाठी वनकर, कोरेवार, मडावी, प्राचार्य डी. के. मेश्राम सहभागी झाले होते. संचालन डी. डी. मैंद तर आभार प्रा. बुरे यांनी मानले.
कारेगाव/चोप - किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोरेगांव येथिल विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी गावात प्रभात फेरी काढली. यावेळी प्राचार्य व्ही. एस़ मुंगमोडे, संस्थेचे सचिव महेन्द्र चचाणे, पर्यवेक्षक जि. के़ पिलारे, तलाठी पिंटू बोकडे, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
अहेरी - स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, भामरागडचे तहसीलदार अरुण येरचे, प्राचार्य मनोरंजन मंडल, प्रा. विजय खोंडे सहभागी झाले होते. सशक्त भारताची निर्मिती करण्याकरिता युवकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले. प्रा. मोरे, प्रा. बिश्वास, डासांबरे, कुंडू, हलामी यांनी सहकार्य केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)