विभागीय आयुक्तांची धानोरा बालिका विद्यालयाला भेट

By Admin | Updated: March 17, 2016 01:57 IST2016-03-17T01:57:15+5:302016-03-17T01:57:15+5:30

नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी बुधवारी धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन तेथील विद्यार्थिनींशी प्रत्यक्ष वर्गात जाऊन संवाद साधला.

Visit to Dhanora Balika Vidyalaya of Divisional Commissioner | विभागीय आयुक्तांची धानोरा बालिका विद्यालयाला भेट

विभागीय आयुक्तांची धानोरा बालिका विद्यालयाला भेट

विद्यार्थिनींशी संवाद साधला : जिल्हाधिकारी उपस्थित
धानोरा : नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी बुधवारी धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन तेथील विद्यार्थिनींशी प्रत्यक्ष वर्गात जाऊन संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते.
विभागीय आयुक्तांच्या भेटीदरम्यान ज्ञानरचनावादानुसार विद्यार्थिनी अध्ययनाचे धडे गिरवित असल्याचे दिसून आले. यावेळी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा शिंपी यांनी विद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण आदी बाबींची सखोल माहिती दिली. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जि. प. च्या नरेगा विभागाचे बीडीओ शालिकराम पडघन, जिल्हा समन्वयक चौधरी, तहसीलदार मडावी, संवर्ग विकास अधिकारी कोल्हे, अतिरिक्त गटविकास अधिकारी फुलसंगे व विद्यालयातील सर्व शिक्षिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Visit to Dhanora Balika Vidyalaya of Divisional Commissioner