जिल्हाधिकाऱ्यांची बँकेला भेट
By Admin | Updated: September 18, 2016 01:58 IST2016-09-18T01:58:50+5:302016-09-18T01:58:50+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आष्टी शाखेतील आर्थिक साक्षरता केंद्राला भेट दिली.

जिल्हाधिकाऱ्यांची बँकेला भेट
आष्टी शाखेची पाहणी : साक्षरता केंद्राच्या उपक्रमांचे कौतुक
आष्टी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आष्टी शाखेतील आर्थिक साक्षरता केंद्राला भेट दिली. साक्षरता केंद्रातील साहित्य, बॅनर बघून जिल्हाधिकारी भारावून गेले व त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी आष्टी शाखेतील आर्थिक साक्षरता केंद्राच्या पाहणीबरोबरच या केंद्राच्या वतीने आर्थिक साक्षरतेसाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती शाखा व्यवस्थापकाकडून जाणून घेतली. त्याचबरोबर बँकेने २०१६-१७ या खरीप हंगामात किती कर्ज वाटप केले, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली असता, या शाखेला २ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २ कोटी २२ लाख रूपयांचे कर्ज ७०७ शेतकरी सभासदांना देण्यात आले आहे, अशी माहिती शाखा व्यवस्थापकांनी दिली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक आर. एस. खांडेकर, नाबार्डचे व्यवस्थापक आर. एस. खांडेकर उपस्थित होते.