शेतकरी पिता पुत्रांना पुराच्या पाण्यातून काढण्यास ग्रामस्थांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 09:46 PM2022-07-23T21:46:03+5:302022-07-23T21:46:34+5:30

Gadchiroli News येनापूर येथील शेतकरी मनोहर राऊत व त्यांचा मुलगा संदीप राऊत हे शेतात काम करीत असताना अचानक पाणी वाढल्याने ते पाण्यातच अडकून पडले. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना पुरातून  बाहेर काढले. 

Villagers succeeded in pulling the farmer father and son out of the flood waters | शेतकरी पिता पुत्रांना पुराच्या पाण्यातून काढण्यास ग्रामस्थांना यश

शेतकरी पिता पुत्रांना पुराच्या पाण्यातून काढण्यास ग्रामस्थांना यश

Next

गडचिरोलीः  येनापूर येथील शेतकरी मनोहर राऊत व त्यांचा मुलगा संदीप राऊत हे शेतात काम करीत असताना अचानक पाणी वाढल्याने ते पाण्यातच अडकून पडले. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना पुरातून  बाहेर काढले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असतानाच ऐक दिवस पावसाने विश्रांती घेत काल रात्री पासून  धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली अन येनापुर परिसरातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले आसताना आज सकाळी  येनापूर येथील शेतकरी मनोहर राऊत व त्यांचा मुलगा संदीप राऊत  शेतातील पऱ्हे काढण्यासाठी गेले असता शनातच नाल्याचे पाण्यात वाढ होऊन सभोवताल पाणी वाढल्याने  पुरात शेतकरी पिता पुत्र  सापडले. त्यांना काढण्यास सोमंनपल्लीचे सरपंच नीलकंठ नीखाडे यांच्या प्रयत्नातून  ग्रामस्थांना यश आले.

 

Web Title: Villagers succeeded in pulling the farmer father and son out of the flood waters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर