विहीरगाव शाळा बनली डिजिटल
By Admin | Updated: February 8, 2017 02:38 IST2017-02-08T02:38:42+5:302017-02-08T02:38:42+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील विहीरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून डिजिटल बनली आहे.

विहीरगाव शाळा बनली डिजिटल
उद्घाटन कार्यक्रम : प्रगत शैक्षणिक उपक्रमात सातत्य ठेवण्याचे आवाहन
गडचिरोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील विहीरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून डिजिटल बनली आहे. या डिजिटल शाळेचे उद्घाटन मंगळवारी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी (प्राथ.) माणिक साखरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवर्ग विकास अधिकारी पचारे होते. प्रमुख अतिथी म्हणून विहीरगावच्या सरपंच विद्या सातपुते, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, केंद्रप्रमुख दुष्यंत तुरे, माजी सरपंच भक्तदास नवघरे, गुरवळा शाळेचे मुख्याध्यापक सय्यद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव वैरागडे, प्रियंका दळवी, विहीरगाव शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम दडगेलवार, ग्रामसेवक हेमंत गेडाम, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष देवेंद्र भोयर, मोरेश्वर करपते, ग्रा. पं. सदस्य जीजा सिडाम, लोमेश मानापुरे, पुरूषोत्तम कुनघाडकर, सोनुजी कुनघाडकर, शीला मानापुरे, सैैदुल खान पठाण, टुमदेव नवघरे, जितेंद्र शेंडे, ढाकराम चलाख आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांचा शाल व श्रीफळ देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी साखरे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. १ हजार ५५६ शाळांपैकी १६० शाळा डिजिटल बनल्या आहेत. यामध्ये गडचिरोली पं. स. तील ५६ शाळांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख दुष्यंत तुरे, संचालन रायपुरे यांनी केले तर आभार प्रभारी मुख्याध्यापक दडगेलवार यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)