विधानसभा निवडणुकीत विदर्भवादी उमेदवारांनाच साथ द्या
By Admin | Updated: July 12, 2014 23:40 IST2014-07-12T23:40:12+5:302014-07-12T23:40:12+5:30
गैरराजकीय संबंधाने जनमंचने लोकांच्या समस्या जाणून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे सर्वेक्षण केले त्यात ९८ टक्के लोकांनी वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार केला. या लढ्याला सर्व पक्षीय लोकांचा पाठींबा

विधानसभा निवडणुकीत विदर्भवादी उमेदवारांनाच साथ द्या
आरमोरीत सभा : शरद पाटील यांचे आवाहन
आरमोरी : गैरराजकीय संबंधाने जनमंचने लोकांच्या समस्या जाणून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे सर्वेक्षण केले त्यात ९८ टक्के लोकांनी वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार केला. या लढ्याला सर्व पक्षीय लोकांचा पाठींबा मिळत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे महत्व लक्षात घेऊन अनुकुल संधीचा फायदा घ्यावा व स्वंतत्र विदर्भाचा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे हे न जाणता केवळ स्वंतत्र विदर्भाच्या पुरस्कृत उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन जनमंचाचे सल्लागार प्रा. शरद पाटील यांनी केले. आरमोरी येथे आयोजित ‘लढा विदर्भाचा’ या जनजागृतीपर कार्यक्रमात ते बोलत होते.
जनमंचाचे अध्यक्ष अॅड़ अनिल किलोर, प्रा. चंद्रकांत वानखडे, माजी आमदार हरीरामजी वरखडे, जनमंचाचे संयोजक प्रकाश इटनकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते सुधीर भातकुलकर, अॅड. गोविंदराव भेंडारकर, किशोर वनमाळी, प्राचार्य डॉ़ लालसिंग खालसा, भाजपा नेते रविंद्र बावनथडे, नितीन रोंगे, हिरालाल येरमे मंचावर उपस्थित होते़ याप्रंसगी नितीन रोंगे यांनी विदर्भाला गरीब करण्याचा शासनाचा प्रयत्न येथील जनता हानून पाडेल, असा इशारा देऊन जनतेनी येणाऱ्या पिढीसाठी स्वंतत्र विदर्भाचा लढा सुरु ठेवावा असे आवाहन केले. यापं्रसगी कार्यकर्त्यांनी ‘हर हर विदर्भ घर घर विदर्भ अब की बार विदर्भ’ की सरकार असे नारे देवून कार्यकर्त्यांना स्वतंत्र विदर्भाच्या लढ्याची शपथ देण्यात आली सोबतच ९ आॅगस्ट क्रांती दिनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मीतीसाठी ‘रेल देखो, बस देखो’ आंदोलनाची रुपरेषा सांगीतली़ याप्रसंगी सभेला उपसरपंच दिपक निंबेकार, श्रीहरी कोपूलवार, सुनील नंदनवार, भारत बावनथडे, विजय ठवरे, सुधीर सपाटे, वेणूताई ढवगाये, अब्दुलभाई पंजवानी, रामभाऊ कुर्जेकर, रविंद्र नैताम, सदानंद कुथे, गणपत वडपल्लीवार, नामदेव सोरते, प्रकाश खोब्रागडे, उपस्थित होते़ प्रास्ताविक सुधीर भातकुलकर संचालन व आभार प्रा़ शशीकांत गेडाम यांनी केले़ (प्रतिनिधी)