भाजप कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:12 IST2019-05-25T00:11:49+5:302019-05-25T00:12:13+5:30
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा लोकसभा निवडणुकीत ७७ हजार ५२६ मतांनी पराभव करीत विजय संपादन केले. शुक्रवारी सायंकाळी गडचिरोली शहरातून ढोलताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

भाजप कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा लोकसभा निवडणुकीत ७७ हजार ५२६ मतांनी पराभव करीत विजय संपादन केले. शुक्रवारी सायंकाळी गडचिरोली शहरातून ढोलताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
निकालाच्या दिवशीच सायंकाळी विजयी मिरवणूक काढायची होती. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्याने विजय मिरवणूक काढण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. भाजप कार्यालयातून विजय मिरवणुकीला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गाने ही मिरवणूक फिरविण्यात आली. ढोलताशांच्या गजरात व आकर्षक रोषणाईत विजयी मिरवणूक निघाली. रॅलीमध्ये जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा डोळस, नगरसेवक प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, केशव निंबोड, केशव दशमुखे, प्रशांत वाघरे, अमिता मडावी आदी उपस्थित होते.