उभ्या ट्रकला दुचाकीची धडक
By Admin | Updated: May 7, 2016 00:09 IST2016-05-07T00:09:03+5:302016-05-07T00:09:03+5:30
येथील कृषी जकात नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर दोन जखमी झाल्याची घटना ...

उभ्या ट्रकला दुचाकीची धडक
एक ठार, दोन जखमी : आरमोरीतील घटना
आरमोरी : येथील कृषी जकात नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर दोन जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास नवीन बसस्टँड समोर घडली. प्रभाकर मन्साराम जांगळे रा. अरसोडा असे या अपघात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
वैरागड येथील लग्नाचा कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा राजू माधव वाटगुरे, प्रभाकर मन्साराम जांगळे व अंगराज बर्वे हे तिघेही जण एमएच ३३ जे ६३७२ या दुचाकीने अरसोडा गावाला जायला निघाले. दरम्यान मेंढावरून बांबू भरून नागपूरकडे जाणारा एमएच ४९ - ०२७५ ६ हा ट्रक आरमोरी येथील नवीन बसस्टँडसमोर कृषी जकात नाक्याजवळ वाहतूक परवाना पास दाखविण्यासाठी उभा होता. यावेळी चक्रीवादळामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र अंधार होता. या उभ्या असलेल्या बांबूच्या ट्रकला दुचाकीने मागून जबर धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेला प्रभाकर मन्साराम जांगळे याचा आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर राजू वाटगुरे व अंगराज बर्वे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी ट्रक चालक बाबा सूर्यभान गुरनुले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)