बोटेकसा येथे वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 06:00 IST2020-06-08T06:00:00+5:302020-06-08T06:00:07+5:30

मसेली येथेही चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सी.आर.भंडारी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षणाधिकारी व बोटेकसा केंद्र प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. बोटेकसा व मसेली या दोन्ही चेकपोस्टसाठी प्रत्येकी दोन शिक्षकांची नियुक्ती तीन शिफ्टमध्ये करण्यात आली आहे.

Vehicle inspection at Botexa | बोटेकसा येथे वाहनांची तपासणी

बोटेकसा येथे वाहनांची तपासणी

ठळक मुद्देयंत्रणा अलर्ट : कोरोनाला रोखण्यासाठी केली जाताहे उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी महसूल विभागाच्या वतीने परवानगी मिळवून आवागमन करणारी वाहने व नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोटेकसा येथे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
मसेली येथेही चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सी.आर.भंडारी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षणाधिकारी व बोटेकसा केंद्र प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. बोटेकसा व मसेली या दोन्ही चेकपोस्टसाठी प्रत्येकी दोन शिक्षकांची नियुक्ती तीन शिफ्टमध्ये करण्यात आली आहे. पहिली पाळी सकाळी १० ते दुपारी १२, दुसरी पाळी १२ ते सायंकाळी ६ व तिसरी पाळी सायंकाळी ६ रात्री १२ वाजता अशी ठेवण्यात आली आहे. सदर दोन्ही चेकपोस्टसाठी बोटेकसा, बेतकाठी, कोरची, बेडगाव या चार केंद्रातील जि.प.शाळेतील तसेच खासगी शाळेतील शिक्षकांची टप्प्याटप्प्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे. २० मे ते ३१ मे असा पहिला टप्पा होता. या टप्प्यात १४४ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. दुसरा टप्पा १ ते १५ जून असा आहे. या टप्प्यासाठी १८० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बोटेकसा चेकपोस्टवर नोडल अधिकारी म्हणून एन.बी.नागापुरे, एच.बी.सोमनकर, डी.व्ही.पुरनकर आदी काम पाहत आहेत. याशिवाय वनोपज तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक के.एस.ढिकरे, वनमजूर के.एस.खेला हे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून नोंदी घेत आहेत. कोरचीपासून १२ किमी अंतरावरील सदर चेक पोस्ट परिसरातूनच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कोरची तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून असल्याने छत्तीसगड जिल्ह्यातील अनेक वाहने या मार्गाने प्रवास करतात. त्यांच्यावरही तपासणी नाक्याच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे.

आतापर्यंत १२०० वाहनांची झाली तपासणी
बोटेकसा येथील चेकपोस्टवर २० मे पासून ५ जूनपर्यंत एकूण १ हजार २०९ वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये दुचाकी, कार व ट्रकांचा समावेश आहे. चालक व प्रवाशी मिळून या वाहनांमधून २ हजार ७३४ प्रवाशांनी आवागमन केले. १ हजार ५२५ मजुरांची या चेकपोस्टवर नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: Vehicle inspection at Botexa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.