वाहनाची झाडाला धडक; चालक गंभीर
By Admin | Updated: May 12, 2017 02:31 IST2017-05-12T02:31:01+5:302017-05-12T02:31:01+5:30
आलापल्लीवरून मुलचेरा तालुक्यातील कांचनपूरकडे जाणाऱ्या भरधाव बोलेरो पिकअप वाहनाची झाडाला धडक बसल्याने

वाहनाची झाडाला धडक; चालक गंभीर
मालवाहू वाहनाचे नुकसान : कांचनपूर-मुलेचरादरम्यानची घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आलापल्लीवरून मुलचेरा तालुक्यातील कांचनपूरकडे जाणाऱ्या भरधाव बोलेरो पिकअप वाहनाची झाडाला धडक बसल्याने वाहनचालक गंभीर जखमी झाल्याची घटना कांचनपूर-मुलचेरादरम्यान नदीजवळ बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. अजित रंजन साना (३४) रा. कांचनपूर ता. मुलचेरा असे जखमी वाहनचालकाचे नाव आहे.
एमएच-३३-जी-२०३४ क्रमांकाच्या स्वत:च्या बोलेरो पिकअप वाहनाने अंजित साना आलापल्लीवरून कांचनपूरकडे जात होते. दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक बसली. यात वाहनचालक अजित साना गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी बोलाविण्यात आली. जखमी अजित साना याला उपचारासाठी चंद्रपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दुचाकी अपघातात वायरमन ठार
एटापल्ली : वागेसरी येथील विद्युत पुरवठा दुरूस्तीचे काम आटोपून दुचाकीने कसनसूरला परत जाताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने वायरमन गंभीर जखमी झाला व एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांचा रात्री ९.३० वाजता मृत्यू झाला. सदर अपघाताची घटना हालेवारा-कसनसूर मार्गावरील शिव मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. सुनील ठाकरे (३५) असे अपघातात ठार झालेल्या वायमनचे नाव आहे. या अपघातात दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यानंतर जखमी अजित साना याला प्रथम कसनसूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले. येथून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात रात्री ९.३० वाजता आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आहे. सदर अपघातातील दुसरा दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाल्याचे मृतक सुनील ठाकरे याच्या नातेवाईकांनी सांगितले.