शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहन कालव्यात कोसळले; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 22:18 IST

भिवापूर जवळील कन्नमवार जलाशयाच्या नहरात बोलोरे पीकअप वाहन कोसळून ३ जण ठार तर १३ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे१३ वºहाडी गंभीर जखमी : कन्नमवार जलाशयाच्या १५ फूट खोल कालव्यात घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : भिवापूर जवळील कन्नमवार जलाशयाच्या नहरात बोलोरे पीकअप वाहन कोसळून ३ जण ठार तर १३ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.मुकुंदा दिवाकर वासेकर (४५) रा. सिमतळा, तुळशीराम शिवा बुरांडे (५५) रा. इटोली, सुषमा बुरांडे (३५) रा. इटोली जिल्हा चंद्रपूर अशी मृतकांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये पार्वता देवतळे (७०), श्यामसुंदर देवतळे (४०), सावित्रीबाई वासेकर (६०), बापुजी देवतळे (७०) सर्व रा. इटोली, भागवती दुधबळे (६५) रा. मानोरा, राजू पिंपरे (४०) रा. बल्हारशहा हे गंभीर जखमी आहेत. यापैकी काहींना गडचिरोली तर काहींना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. ताराबाई देवतळे (६५), संगीता देवतळे (४०), रामदेव पिपरे (५०), बापुजी देवतळे (७०), विमल चलाख (४५) सर्व रा. इटोली, माधुरी वासेकर (३०) रा. सिमतळा, आनंदाबाई वासेकर (७०) रा. सुशी यांच्यावर ग्रामीण रूग्णालय चामोर्शी येथे उपचार सुरू आहेत.या वाहनात जवळपास २५ वºहाडी होते. १५ फुट खोल असलेल्या नहरात भरधाव वेगाने असलेले वाहने कोसळले व ते उलटलेसुद्धा यामध्ये बरेचशे वºहाडी वाहनाच्या बाहेर फेकल्या गेले. नहरात असलेल्या दगडांना आदळून काही जणांच्या कंबर, डोके, कपाळाला मार लागला आहे.बल्हारशहा तालुक्यातील इटोली येथील उमाजी देवतळे यांच्या मुलीचा विवाह चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथील देवराव वासेकर यांच्या मुलासोबत गुरूवारी पार पडला. लग्न ओटोपून वरात एमएच ३४ बी जी ०५८५ क्रमांकाच्या महेंद्रा बोलोरे पीकअप वाहनाने चामोर्शीकडून इटोलीकडे जाण्यासाठी निघाली असता, भिवापूर गावाजवळील दिना नहरात वाहन उलटले. भिवापूर गावाजवळ नहरावर पूल आहे. या पुलाजवळ वळण आहे. भरधाव वेगाने असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुलावरून वाहन न जाता सरळ नाल्यात जाऊन कोसळले व उलटले.मालवाहू वाहनाने प्रवासी वाहतूक वाढलीलग्नसराईच्या कालावधीत वरात नेण्यासाठी प्रामुख्याने मालवाहू वाहनांचा वापर केला जातो. मालवाहू वाहने प्रवाशी वाहतुकीसाठी वापरणे अवैध असले तरी या वाहनांचा वापर होतो. उभे राहून प्रवाशी प्रवास करतात. वरून कोणतेही संरक्षण राहत नसल्याने वाहन उलटल्यावर प्रवाशी मृत्यूमुखी पडतात. विशेष म्हणजे, बुधवारी कोडसेपल्लीत दोन वाहनांची धडक होऊन चार जणांचा बळी गेला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू