वाहन लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:11+5:302021-01-09T04:30:11+5:30

गडचिरोली : जिल्ह्यात प्रत्येक गावी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या प्रवासी निवाऱ्यांकडे एस.टी. विभाग व शासनाचे दुर्लक्ष ...

Vehicle auction | वाहन लिलाव

वाहन लिलाव

गडचिरोली : जिल्ह्यात प्रत्येक गावी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या प्रवासी निवाऱ्यांकडे एस.टी. विभाग व शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही निवारे मोडकळीस आले आहेत. काही निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर थांबून बसची वाट बघत असल्याचे चित्र बघावयास मिळते.

जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करा

गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेले वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.

समाजकल्याणच्या वसतिगृहाची मागणी

आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.

अनाधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई करा

देसाईगंज : शहरात अनेक मोबाईल टॉवर नगरपरिषदेची परवानगी न घेताच उभारण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सदर टॉवर उभे आहेत. मात्र, न. प. ने टॉवरवर कोणतीही कारवाई केली नाही.

कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त

अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांतील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही.

भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात

आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.

दुर्गम गावात लाईनमनच नाही

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते तसेच एका लाईनमनकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.

सभागृहाच्या मागे घाणीचे साम्राज्य

गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून याकडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही नेऊन टाकतात.

कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करा

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर देण्याची मागणी आहे. संबंधित नगरसेवकाचे याकडे दुर्लक्ष आहे.

सकस आहार जातोय जनावरांच्या घशात

आलापल्ली : अंगणवाडीतील बालकांना पॉकेटबंद सकस आहार पुरविला जातो. मात्र, बहुतांश माता सदर आहार मुलाला बनवून देत नाही. अनेकदा बालकांचे खाद्य जनावरांना खाऊ घातले जाते, असे प्रकार सर्रास घडत आहेत.

अनधिकृत गतिरोधक हटवा

गडचिरोली : महामार्गावर गतिरोधक बांधायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, बहुतांश गावांमध्ये तसेच राज्य महामार्गांवर नागरिकांनी तसेच ग्रामपंचायतींनी कोणतीही परवानगी न घेता गतिरोधक बांधले आहे. सदर अवैध गतिरोधक हटविण्यात यावे.

वाहनांच्या गतीला आवर घाला

आष्टी : जिल्हाभरातून प्रमुख मार्गांवर भरधाव वाहनांमुळे पहाटेच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे वळणमार्गावर गतिरोधक लावून वाहनांच्या गतीला आवर घालण्यात यावा.

बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

धानोरा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत.

Web Title: Vehicle auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.