‘उमेद’च्या वतीने महिलांच्या विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:44+5:302021-03-15T04:32:44+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला उड्डान प्रभाग संघाच्या अध्यक्ष नंदाबाई चंदनखेडे होत्या उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के होते. ...

‘उमेद’च्या वतीने महिलांच्या विविध स्पर्धा
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला उड्डान प्रभाग संघाच्या अध्यक्ष नंदाबाई चंदनखेडे होत्या उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून घोट पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, जनार्धन काळे, पंचायत समिती सदस्य सुरेश कामेलवार, उडान महिला प्रभाग संघाच्या सचिव कांचन राय, कोषाध्यक्ष उषा सज्जन सिडाम, लोकमंगल संस्थेचे प्रकल्प समन्वयक उमाजी कुद्रपवार, तालुका अभियान व्यवस्थापक विनोद बोभाटे, प्रभाग समन्वयक प्रदीप मेश्राम, सोमनपूर मस्यव्यवसाय व्यवस्थापक बबलू बाला, कृषी व्यवस्थापक गीता पोगूलवार यांच्या सर्व महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास शेवटी सर्व विजेत्या महिलांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन समूह संसाधन व्यक्ती सोमनपूरच्या आशावती गावडे यांनी केले तर प्रास्ताविक उमेद प्रभाग समन्वयक प्रदीप मेश्राम यांनी केले तर आभार उज्ज्वला मिस्त्री यांनी मानले.