गुढीपाडव्यानिमित्त विविध धार्मिक विधी तसेच कार्यक्रम घेतले जातात. विविध गुणांचे प्रतीक म्हणून गुढी घरावर उभारली जाते. गुढी उभारताना पालथा कलश, पुष्पहार, जरीची साडी, कडूलिंब, गाठी आदी साहित्य बांबूकाठीला बांधले जातात. त्यानंतर ती घरावर बांधली जाते. तसेच हळदीकुंकू, सुपारी, श्रीफळ ठेवून पूजा केली जाते. यातील प्रत्येक वस्तू विविध गुण दर्शवितात. पालथा कलश यशस्वी जीवनाचे प्रतीक आहे, तर पुष्पहार जीवनातील मांगल्य दर्शविते. जरीची साडी वैभव, श्रीफळ सिद्धी, पाट जीवनातील स्थैर्य, कडूलिंब सुदृढ आरोग्य तर साखरगाठी जीवनात गोडवा व माधुर्य राखण्याचे प्रतीक मानले जाते. बांबूकाठी सामर्थ्य, हळदीकुंकू स्त्रियांचे सौभाग्य अबाधित राखण्याचे दर्शविते. चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा गुढीपाडवा सण हिंदू संस्कृतीत मराठी वर्षातील पहिला दिवस आहे.
विविध शुभकार्यास आज हाेणार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:35 IST