मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:58+5:302021-01-10T04:27:58+5:30
गडचिराेली : जिल्ह्यातील कृषिपंपांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन माजी जि.प.सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल ...

मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे साकडे
गडचिराेली : जिल्ह्यातील कृषिपंपांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन माजी जि.प.सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. मुख्यमंत्री ठाकरे हे ८ जानेवारीला गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाहणीसाठी आले असता, ब्रह्मपुरी येथील हेलिपॅडवर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. निवेदनात गडचिराेली जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, वनावर आधारित उद्याेग सुरू करावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, नाेकरभरतीमध्ये जिल्ह्यातील युवकांना प्राधान्य द्यावे, काेराेना काळातील वीज बिल माफ करावे आदी मागण्यांचा समावेश हाेता. याप्रसंगी शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, माजी तालुकाप्रमुख नंदू चावला व कार्यकर्ते उपस्थित हाेते.