वेलगुर-किष्टापूर गाव पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक

By Admin | Updated: November 16, 2016 02:01 IST2016-11-16T02:01:26+5:302016-11-16T02:01:26+5:30

आमदार दत्तक ग्राम योजनेंतर्गत तालुक्यातील वेलगुर-किष्टापूर हे गाव पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांनी दत्तक घेतले आहे.

Valergur-Kistapur village adopted by the Guardian Minister | वेलगुर-किष्टापूर गाव पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक

वेलगुर-किष्टापूर गाव पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक

विकासाची दिली ग्वाही : शेतकऱ्यांना बियाणे व साहित्याचे वितरण
अहेरी : आमदार दत्तक ग्राम योजनेंतर्गत तालुक्यातील वेलगुर-किष्टापूर हे गाव पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांनी दत्तक घेतले आहे. १३ नोव्हेंबर रोजी आमदार दत्तक ग्राम योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
आमदार दत्तक ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गावाचा कायापालट करण्याची ग्वाही यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली. पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांच्याहस्ते शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत साहित्याचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला तालुका भाजपा अध्यक्ष रवी नेलकुद्री, नगरसेवक गिरीष मद्देर्लावार, संजय अलोणे, सागर डेकाटे, मदने आदीसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राजू येरमे, सुरेश येरमे, दिनेश येरमे, किशोर पोरतेट, विनोद करपेत, राकेश सडमेक, मधुकर येरमे, महेंद्र सिडाम आदींनी पक्षात प्रवेश केला.

Web Title: Valergur-Kistapur village adopted by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.