शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
3
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
5
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
6
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
7
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
8
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
9
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
10
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
11
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
12
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
13
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
14
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
15
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
16
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
17
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
18
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
19
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
20
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ

वैरागडात स्वच्छता अभियानाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत वैरागड येथील ग्रामपंचायतीने सन २०१८-१९ या चालू वर्षात आतापर्यंत १० ...

ठळक मुद्देरस्त्यांवर कचऱ्याचे ढीग : गटारे, रस्ते देखभालीवर १० महिन्यांत तीन लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत वैरागड येथील ग्रामपंचायतीने सन २०१८-१९ या चालू वर्षात आतापर्यंत १० महिन्यांत गटारे, रस्ते देखभालीच्या कामावर तीन लाख रूपयांचा खर्च केला आहे. मात्र गावाच्या सीमेलगतच्या दोन रस्त्यावर कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य आहे. स्वच्छता अभियानाचा वैरागड गावात फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.येथील महात्मा फुले चौक ते आदीशक्ती माता रोड आणि गाडे मोहल्ल्यातून मेंढा, वडेगावकडे जाणाºया रस्त्याच्या कडेला कचºयाचे व शेणखताचे मोठे ढिगारे असल्याने या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी या मार्गाने ये-जा करणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.करपडा मार्गावर अंकूर आश्रमशाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर परिसरातील कुटुंबीय आपल्या घरातील केरकचरा व गुरांचे शेण शाळेसमोर नेऊन टाकतात. त्यामुळे सदर निवासी शाळेत राहणाºया विद्यार्थ्यांचे आरोग्य धोेक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर तोंडी सूचनाही दिली. मात्र याचा काही उपयोग झाला नाही. ग्रामपंचायतीने यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. ग्रामपंचायत चौकापासून पुढे मेंढा, वडेगाव या गावाला जाणाºया बायपास मार्गावर पीतांबर लांजेवार यांच्या मालकीच्या बोळीलगत काही लोकांनी शेणाचे ढीग अगदी रस्त्यावर टाकले आहेत. सदर रस्त्याने पायदळ चालणे देखल अडचणीचे झाले आहे. हा रस्ता गोरजाई मंदिराकडे जाणारा आहे. जानेवारी महिन्यात येथील गोरजाई मंदिरात यात्रा भरते. या यात्रेला पूर्वविदर्भातील माना समाज बांधव हजारोंच्या संख्येने दाखल होतात. सदर माना समाजाच्या भाविकांसाठी सोयीचे व्हावे, याकरिता सदर मार्गावरील शेणखत व कचºयाचे ढीग नष्ट करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.वैरागड येथील ग्रामपंचायतीच्या आमसभेमध्ये रस्ते, नाली व स्वच्छतेच्या प्रश्नावर चर्चा केली जाते. वारंवार पाठपुरावाही केला जातो, मात्र गावातील विविध समस्या मार्गी लावण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असते, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे.ग्रामपंचायत चौकातून कढोलीकडे जाणाऱ्या बायपास मार्गाची स्वच्छता करण्यात आली असून आता वडेगाव-मेंढा बायपास मार्गाच्या स्वच्छतेचे काम ग्रामपंचायतीमार्फत हाती घेण्यात येईल. रस्त्यावरील शेणखत व कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावून रस्ते मोकळे केले जातील. तसे ग्रामपंचायतीचे नियोजन आहे.- एन.जी.घुटके, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रा.पं. वैरागड

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली